खंडित वीजपुरवठा चार दिवसांत सुरळीत होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:21 IST2021-07-28T04:21:44+5:302021-07-28T04:21:44+5:30
तनपुरे सहकारी साखर कारखान्याचा गेल्या चार ते पाच दिवसांपासून वीजपुरवठा खंडित असल्यामुळे परिसरात अंधाराचे साम्राज्य आहे. कारखान्याकडे महाराष्ट्र राज्य ...

खंडित वीजपुरवठा चार दिवसांत सुरळीत होणार
तनपुरे सहकारी साखर कारखान्याचा गेल्या चार ते पाच दिवसांपासून वीजपुरवठा खंडित असल्यामुळे परिसरात अंधाराचे साम्राज्य आहे. कारखान्याकडे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाची १ कोटी १८ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे थकबाकी भरणे हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लॉकडाऊनच्या काळात कारखान्याने थकबाकीची रक्कम भरली नव्हती. त्यामुळे महावितरणने कारखान्याचे कनेक्शन कट करण्याचा निर्णय प्रत्यक्षात अंमलात आणला. कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केला आहे. येत्या चार ते पाच दिवसांत विद्युतपुरवठा सुरळीत होणार आहे.
...............
तनपुरे कारखान्याचा वीजपुरवठा चार ते पाच दिवसांपासून खंडित केला आहे. कारखान्याची थकबाकी जवळपास दोन अडीच वर्षांपासून एक कोटीच्या घरात आहे. मुंबई हेड ऑफिसने मुदत देऊनदेखील कारखान्याने हप्ते भरलेले नाही. मागील हप्ते भरल्यावर वीजपुरवठा सुरळीत केला जाईल.
- प्रदीप देहरकर, उपकार्यकारी अभियंता, देवळाली प्रवरा, राहुरी
...................
तनपुरे सहकारी साखर कारखाना यंदा सुरू होणार आहे. कारखान्याची जी वीजबिलाची थकबाकी आहे त्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. ४ ते ५ दिवसांनंतर वीजपुरवठा सुरळीत होणार आहे.
- नामदेवराव ढोकणे, चेअरमन, तनपुरे सहकारी साखर कारखाना, राहुरी