अन्यायाला वाचा फोडण्यासाठी डाकसेवकांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 13:49 IST2018-05-23T13:49:39+5:302018-05-23T13:49:53+5:30
डाक विभाग व केंद्र सरकारने वेळोवेळी ग्रामीण डाक सेवकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय डाक सेवक संघटनेने बेमुदत आंदोलनास सुरुवात केली आहे.

अन्यायाला वाचा फोडण्यासाठी डाकसेवकांचे आंदोलन
अहमदनगर : डाक विभाग व केंद्र सरकारने वेळोवेळी ग्रामीण डाक सेवकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय डाक सेवक संघटनेने बेमुदत आंदोलनास सुरुवात केली आहे.
आज सकाळपासून अहमदनगर डाक कार्यालयात आंदोलनास सुरुवात करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष आनंदराव पवार व सचिव एन.बी.जहागीरदार हे आंदोलनाचे नेतृत्व करत असून संजय परभणे, तुळशीराम गाढवे, सुरेश शिंदे, संतोष काळे यांच्या मोठ्या प्रमाणात आंदोलक सहभागी झाले आहेत.