सोशल मिडियावर सरकारविरोधात पोस्ट, पोलिस कर्मचारी निलंबित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 17:55 IST2017-10-15T17:54:55+5:302017-10-15T17:55:05+5:30

सरकारविरोधात अक्षेपार्ह लिखाण सोशल मीडियात व्हायरल केल्यानं अहमदनगर जिल्ह्यात एका पोलिस कर्मचा-याचे निलंबन करण्यात आले आहे. शनिवारी जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी ही कारवाई केली आहे. यामुळे सरकारी कर्मचा-यांना चांगलीच धास्ती भरली आहे. 

Posting against the government on social media, the police worker suspended | सोशल मिडियावर सरकारविरोधात पोस्ट, पोलिस कर्मचारी निलंबित 

सोशल मिडियावर सरकारविरोधात पोस्ट, पोलिस कर्मचारी निलंबित 

लोकमत न्यूज नेटवर्क 
अहमदनगर : सरकारविरोधात अक्षेपार्ह लिखाण सोशल मीडियात व्हायरल केल्यानं अहमदनगर जिल्ह्यात एका पोलिस कर्मचा-याचे निलंबन करण्यात आले आहे. शनिवारी जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी ही कारवाई केली आहे. यामुळे सरकारी कर्मचा-यांना चांगलीच धास्ती भरली आहे. 

 रमेश शिंदे असे या पोलीसाचे नाव आहे. शनिवारी या कर्मचा-याचे निलंबन केले आहे.  रमेश शिंदे हा काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांचा अंगरक्षक म्हणून काम पाहत होता.  राज्यात प्रथमच अशा प्रकारची कारवाई होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर पोस्ट करताना विचार करावा लागणार आहे. नेमकी पोस्ट काय होती याचा खुलासा अद्याप झालेला नाही. 

Web Title: Posting against the government on social media, the police worker suspended