संगमनेरमध्ये डाक सेवकांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 16:07 IST2017-08-21T16:07:59+5:302017-08-21T16:07:59+5:30
संगमनेर : ग्रामीण डाक सेवकांच्या विविध मागण्यासाठी सोमवारी संगमनेर - अकोले येथील डाक सेवकांनी संगमनेर प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ...

संगमनेरमध्ये डाक सेवकांचा मोर्चा
स गमनेर : ग्रामीण डाक सेवकांच्या विविध मागण्यासाठी सोमवारी संगमनेर - अकोले येथील डाक सेवकांनी संगमनेर प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ग्रामीण डाक सेवकांना सातवा वेतन आयोग लवकरात लवकर लागू करावा, ग्रामीण डाक सेवकांना पोस्ट खात्यात समाविष्ट करून ८ तासांचा पगार देण्यात यावा, सरकारी कर्मचाºयांप्रमाणे सर्व सेवा सुविधा देण्यात याव्यात, जुनी पेन्शन योजना लागू करावी, कमलेश चंद्रा समितीने दिलेल्या अहवालाची अंमलबजावणी करण्यात यावी आदी मागण्या डाकसेवकांनी केल्या आहेत. याबाबतचे निवेदन प्रांताधिकाºयांना देण्यात आले.