पोपटराव पवार यांची गरुड हॉस्पिटलला भेट - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:21 IST2021-09-03T04:21:30+5:302021-09-03T04:21:30+5:30

अहमदनगर : सावेडी रस्त्यावरील गरुड हॉस्पिटल व अहमदनगर कॅन्सर सेंटरला पद्मश्री पोपटराव पवार यांनी बुधवारी सदिच्छा भेट दिली. ...

Popatrao Pawar's visit to Garud Hospital - A | पोपटराव पवार यांची गरुड हॉस्पिटलला भेट - A

पोपटराव पवार यांची गरुड हॉस्पिटलला भेट - A

अहमदनगर : सावेडी रस्त्यावरील गरुड हॉस्पिटल व अहमदनगर कॅन्सर सेंटरला पद्मश्री पोपटराव पवार यांनी बुधवारी सदिच्छा भेट दिली. यावेळी कॅन्सर सर्जन डॉ.प्रकाश गरूड, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.पद्मजा गरुड, रेडीएशनतज्ज्ञ डॉ.जगदिश शेजूळ, डॉ.अजिता गरुड (शिंदे), डॉ.योगेश पवार, डॉ.शुभदा नलावडे आदी उपस्थित होते. यावेळी पवार म्हणाले, सध्या कॅन्सरचे प्रमाण वाढलेले असून, सर्वांनी जागृत असणे आवश्यक आहे. कॅन्सरला न घाबरता, त्यांचे निदान लवकर झाल्यास तो पूर्णत: बरा होऊ शकतो. गरुड हॉस्पिटलमध्ये सर्व उपचार एकाच छताखाली उपलब्ध झाले आहेत. योग्य व सात्विक आहार, व्यायाम व व्यसनापासून दूर राहणे हे सर्व कॅन्सर प्रतिबंधक आहेत. आनंदी, सकारात्मक वृत्ती ठेवल्यास कॅन्सरवर मात करणे शक्य आहे. गरुड हॉस्पिटल व अहमदनगर कॅन्सर सेंटरला ३५ वर्षांची परंपरा असून, या ठिकाणी जागतिक दर्जाचे कॅन्सर उपचार केले जातात.

डॉ.प्रकाश गरूड म्हणाले, गेल्या वर्षापासून नगर शहरात प्रथमच कॅन्सर रेडीओथेरेपीचा या सेंटरमध्ये समावेश केला आहे. त्यामुळे कॅन्सरच्या सर्व उपचारपद्धती एकाच छताखाली उपलब्ध होत आहेत. (वा. प्र.)

Web Title: Popatrao Pawar's visit to Garud Hospital - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.