शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

गरीब शेतकऱ्याची लेक अमेरिकेला चालली, शिक्षणासाठी चुलत्याने जमिन गहाण ठेवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2018 09:59 IST

तालुक्यातील कोरेगावसारख्या दुर्गम दुष्काळी गावातील निरक्षर शेतकरी संजय पवार यांची मुलगी श्रध्दा हिने इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर, या क्षेत्रातील पदवीत्तर शिक्षण घेण्यासाठी श्रद्धा अमेरिकेला निघाली आहे

बाळासाहेब काकडे श्रीगोंदा - तालुक्यातील कोरेगावसारख्या दुर्गम दुष्काळी गावातील निरक्षर शेतकरी संजय पवार यांची मुलगी श्रद्धा हिने इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर, या क्षेत्रातील पदवीत्तर शिक्षण घेण्यासाठी श्रद्धा अमेरिकेला निघाली आहे. श्रद्धाच्या रुपाने कोरेगावची पहिलीच कन्या परदेशात शिक्षणाची वारी करणार आहे. गरीब शेतकऱ्याची हुशार लेक अमेरिकेला चालल्यामुळे, कोरेगावकर आज हरिनामाच्या जयघोषात श्रद्धाला शुभेच्छा आणि निरोप देणार आहेत. 

वडील संजय पवार यांचे शिक्षण सहावी तर आई नंदा ही निरक्षर. या पवार दाम्पत्यास स्वप्नील व श्रद्धा ही दोन मुले आहेत. साकळाईच्या डोंगर पायथ्याशी आठ एकर कोरडवाहू शेती, मुलांनी खूप शिकून फाटक्या परीस्थितीला आकार द्यावा म्हणून संजय व नंदा यांनी मुलांच्या शिक्षणासाठी जीवाचे रान केले. मात्र, आई वडिलांची परीस्थिती पाहून स्वप्नीलने बारावीतून शाळा सोडली आणि शेतीत काम सुरू केले. तर श्रद्धा ही लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. तिने इयत्ता पहिले ते सातवीपर्यंतचे शिक्षण कोरेगाव येथील प्राथमिक शाळेत तर दहावीपर्यंतचे शिक्षण चार किमी अंतरावरील चिखली येथील रामेश्वर विद्यालयात सायकलवर प्रवास करुन पूर्ण केले. त्यानंतर, नगर येथील राधाबाई काळे महिला महाविद्यालयात अकरावी बारावी केली आणि पुणे येथील सिंहगड महाविद्यालयात इ अॅण्ड टी सीमध्ये इंजिनिअरींगची पदवी घेतली. इंजिनिअरींगचे पदवीत्तर शिक्षण घेण्यासाठी तिची अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील एका विद्यापीठात निवड झाली आहे.श्रद्धा हिची गेल्यावर्षीच शिक्षणासाठी अमेरिकेत निवड झाली होती. मात्र, बॅंकांनी शैक्षणिक लोन नाकारले. याउलट शैक्षणिक लोन मिळवून देतो म्हणून एका एंजटाने संजय पवार यांना दोन लाख रुपयांस फसविले. पण, मुलीच्या शिक्षणासाठी वाटेल ते करण्याची तयारी संजय पवार यांनी ठेवली. यंदा मित्र आणि भावाच्या मदतीने श्रद्धाला शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवण्याचे आई-वडिलांचे स्वप्न साकार झाले आहे. मोठ्या जिद्दीने अमेरिकेत शिक्षण घेण्याची संधी मिळालेल्या श्रद्धाचा कोरेगाव ग्रामस्थांनी हरिनामाच्या गजरात शुभेच्छा कार्यकम आयोजीत केला आहे.  

देव माणूस भेटला श्रद्धाचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी 40 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. माझे नगर येथील मित्र सुनिल कराळे व माझे बंधू विजय पवार यांनी लाख मोलाची मदत केली. माझ्या भावाने स्वताची जमीन श्रद्धाच्या शिक्षणासाठी गहाण ठेवली. कराळेसारखे मित्र भेटले म्हणून माझ्या मुलीचे अमेरिकेत शिक्षण घेण्याचे ध्येय पूर्ण झाल्याचे भावनिक उद्गार काढताना श्रद्धाचे वडिल संजय पवार यांना अश्रू अनावर झाले. 

भारतात उद्योग करणार माझ्या आई वडिलांनी माझ्या शिक्षणासाठी डोक्यावर कर्जाचा डोंगर केला चुलत्यांनी साथ केली, त्यांना माझा सलाम आहे. अमेरिकेत शिक्षण घेऊन भारतात स्वत:चा उद्योग सुरू करण्याचे माझे स्वप्न आहे. त्यासाठी खूप कष्ट घेणार असून चिखली, कोरेगाव आणि येथील शाळा सुधारण्यासाठी काम करणार असल्याचे श्रद्धा हिने लोकमतशी बोलताना म्हटले.  

टॅग्स :FarmerशेतकरीAmericaअमेरिकाEducationशिक्षण