पिंप्री चौफुला-म्हसे रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:21 IST2021-01-23T04:21:33+5:302021-01-23T04:21:33+5:30
ढवळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील पिंप्री चौफुला ते म्हसे रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. खड्डेच खड्डे पडले असून, साईडपटट्याही ...

पिंप्री चौफुला-म्हसे रस्त्याची दुरवस्था
ढवळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील पिंप्री चौफुला ते म्हसे रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. खड्डेच खड्डे पडले असून, साईडपटट्याही उखडल्या आहेत.
पिंप्री चौफुला-म्हसे रस्त्यावरून सध्या मोठ्या प्रमाणावर ऊस वाहतूक सुरू आहे. रस्त्याच्या दुतर्फा झाडे-झुडपे वाढली आहेत. समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. त्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना प्रचंड कसरत करावी लागते. त्यामुळे रस्त्यावर छोटे-मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत. याकडे पंचायत समिती अधिकारी, पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.
----
...तर आंदोलन छेडणार
पिंप्री चौफुला-म्हसे रस्त्याच्या दुरवस्थेला पंचायत समितीच्या संबंधित विभागाचे अधिकारी, या भागातील पदाधिकारी जबाबदार आहेत. तत्काळ रस्ता दुरुस्त न झाल्यास परिसरातील माठ, म्हसे, येळेपणे, वडगाव, रायगव्हाण, पिंप्री कोलंदर गावातील ग्रामस्थांना सोबत घेऊन आंदाेलन छेडू, असा इशारा कुकडीचे माजी संचालक संभाजी देविकर यांनी दिला आहे.
---
निधीच नाही..
सध्या कुठल्याही प्रकारचा निधी उपलब्ध नाही. आम्ही आमच्या विभागातील वरिष्ठस्तरावर रस्ता दुरुस्तीसाठी निधी तरतुदीची मागणी केली आहे. निधी उपलब्ध झाल्यास रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल.
डी. पी. जगताप,
प्रभारी उपअभियंता, जि. प. बा. उपविभाग
फोटो ओळी : २२ म्हसे रस्ता
पिंप्री चौफुला ते म्हसे रस्त्यावरील खड्डे.