लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संगमनेर शहरातील स्मारकाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:14 IST2021-06-27T04:14:45+5:302021-06-27T04:14:45+5:30
लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ बलसाने, जिल्हा संघटक सोमनाथ फुलसुंदर, रमेश तुपसुंदर, संगमनेर तालुका कार्याध्यक्ष संदीप जमधडे, तालुकाध्यक्ष सुनील फुलसुंदर, ...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संगमनेर शहरातील स्मारकाची दुरवस्था
लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ बलसाने, जिल्हा संघटक सोमनाथ फुलसुंदर, रमेश तुपसुंदर, संगमनेर तालुका कार्याध्यक्ष संदीप जमधडे, तालुकाध्यक्ष सुनील फुलसुंदर, शहराध्यक्ष विकास जाधव, वंचित बहुजन आघाडीचे संजय बलसाने आदी या वेळी उपस्थित होते. संगमनेर शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक असून त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. येथे वाचनालयदेखील आहे. स्मारक परिसरात मद्यपींचा मोठा त्रास होतो आहे. स्मारक परिसरात दरारोज साफसफाई करून परिसर स्वच्छ करावा. येथे वृक्षारोपण करत नगर परिषदेने कर्मचारी नियुक्त करावा आदी मागण्या क्रांतिवीर लहुजी सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
--------------
फोटो नेम : २६अण्णाभाऊ साठे स्मारक, संगमनेर :
ओळ : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संगमनेर शहरातील स्मारकाची झालेली दुरवस्था.