खर्ड्याच्या भुईकोट किल्ल्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:34 IST2020-12-13T04:34:54+5:302020-12-13T04:34:54+5:30
खर्डा : १७९५ साली मराठे-निजाम लढाईतील सुवर्णाक्षरांनी लिहिलेल्या मराठ्यांच्या शेवटच्या विजयाचा साक्षीदार असलेला खर्ड्याचा भुईकोट किल्ला सध्या दुरवस्थेत ...

खर्ड्याच्या भुईकोट किल्ल्याची दुरवस्था
खर्डा : १७९५ साली मराठे-निजाम लढाईतील सुवर्णाक्षरांनी लिहिलेल्या मराठ्यांच्या शेवटच्या विजयाचा साक्षीदार असलेला खर्ड्याचा भुईकोट किल्ला सध्या दुरवस्थेत आहे. दरम्यान, या किल्ल्याची बाहेरून दुरुस्ती झाली असली तरी आतील बाजूचे सुशोभीकरणाचे काम बाकी आहे. यासाठी आणखी निधीची गरज आहे.
११ मार्च १७९५ येथे मराठ्यांच्या संयुक्त फौजांनी निजामाच्या सैन्याचा दारुण पराभव केला. युद्धामध्ये मराठ्यांच्या बाजूने ८० हजार सैन्य होते, तर निजामाचे एक लाख तीस हजार सैन्य रंगभूमीवर होते. या रणसंग्रामामध्ये जवळपास चार हजार सैनिक मारले गेले. हा किल्ला १७४५ मध्ये सरदार सुलतान राजेनिंबाळकर यांनी बांधला. २२५ वर्षांपूर्वीच्या मराठ्यांची अखेरची विजयी शौर्यगाथा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या लढाईला इतिहासात मोठे महत्त्व असून हा ऐतिहासिक दुर्ग आजही प्रेरणा देत आहे.
राज्य संरक्षित स्मारक असलेल्या या किल्ल्याच्या डागडुजी, मजबुतीकरण, संवर्धन व सुशोभीकरणासाठी सर्वप्रथम तत्कालीन आघाडी सरकारने २००९-१० साली एक कोटी रुपयांचा निधी दिला. त्यावेळी हा किल्ला बाहेरून आकर्षक व सुस्थितीत दिसत असला तरी आतील बाजूस मात्र भिंतीची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली होती. या निधीतून आतील भिंतींची डागडुजी व मजबुतीकरण करण्यात आले. तटबंदीवरील वाढलेले झाडांचे अतिक्रमण काढण्यात आले. त्यानंतर युती शासनाच्या कालावधीत २०१७ साली पुन्हा तीन कोटी ८५ लाखांचा निधी मिळाला. त्यातून सध्या अगदी संथगतीने काम सुरू आहे. किल्ल्याच्या बाहेरील खंदकाची दुरवस्था प्रमाणात झाली. आता येथील सुशोभीकरण बाग-बागीच्या, शिवसृष्टी, प्रकाश व ध्वनी योजनेद्वारे इतिहासाचि माहिती, खंदक दुरुस्ती, आतील बाजूच्या जुन्या बांधकामाचे पुनरुज्र्जीवन इत्यादीसाठी साधारण आठ ते दहा कोटींचा निधी आवश्यक आहे. नऊ एकरांच्या परिसरात चौकोनी आकाराचा चार प्रमुख व दोन दुय्यम असे सहा बुरूज असलेला हा उत्तराभिमुख किल्ला पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी अगदी आटोपशीर आहे.
...
खर्डा किल्ल्याकडे शासनाचे लक्ष सर्वप्रथम वेधण्याचे काम पर्यटन क्षेत्र विकास कृती समितीने केले. आता आमदार रोहित पवार यांनी ऐतिहासिक किल्ल्यासह खर्डा गावातील गाव व परिसरातील पुरातन मंदिरे, गढी, निंबाळकर समाधी, बारा प्रतिज्योतिर्लिंगे यासह किल्ल्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याचा आराखडा तयार केला आहे.
-विजयसिंह गोलेकर,
अध्यक्ष, खर्डा तीर्थक्षेत्र व पर्यटन विकास कृती समिती.
...
१२खर्डा किल्ला
...