बेलापूर-कोल्हार रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:37 IST2021-03-13T04:37:44+5:302021-03-13T04:37:44+5:30
उक्कलगाव : बेलापूर ते कोल्हार या वर्दळीच्या रस्त्याची मोठी दुरवस्था झाल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. गेल्या ...

बेलापूर-कोल्हार रस्त्याची दुरवस्था
उक्कलगाव : बेलापूर ते कोल्हार या वर्दळीच्या रस्त्याची मोठी दुरवस्था झाल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून कोल्हार येथील नवीन पुलाच्या दुरूस्ती काम सुरू असल्यामुळे नगर- मनमाड महामार्गावरील अवजड वाहतूक बेलापूर ते कोल्हार मार्गे राहुरीला वळविण्यात आली होती. दिवसरात्र येथून वाहतूक सुरू होती. त्यामुळे रस्त्याला मोठे खड्डे पडले आहेत.
रस्त्यावर सातत्याने छोटे -मोठे अपघात घडत आहे. रात्री वाळू तस्करांची वाळू वाहतूक या रस्त्याने सुरू असते. त्यामुळे रस्ता आणखी खचला आहे.
शेतकऱ्यांना शेतातून जनावरांना चारा आणण्यासाठी खराब रस्त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. प्रवरा काठावरील जनतेला खडतर प्रवास करावा लागत आहे.
गळनिंब ते फत्याबाद गावाच्या मधोमध मोठे खड्डे पडले आहेत. मांडवे ते कडीत येथील पुलाजवळील रस्ताही उखडला आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
नाले खोदाईच्या कामामुळे अडचणीत आणखी भर पडली आहे. सर्रासपणे रात्री पाईपलाईनची काम करून सकाळी रस्त्यावरील खड्डे बुजविले जात आहे. एकलहरे गावातील पुलावरील कठडे गायब झाले आहे.