शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
11
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
12
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
13
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
14
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
15
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
16
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
17
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
18
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
19
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
20
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन

पूजा खेडकर यांना दोनदा मिळाले दिव्यांग प्रमाणपत्र; नगर जिल्हा रुग्णालयात सापडली नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2024 10:08 IST

अभिलेख तपासणीमध्ये ही बाब समोर आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी दिली. 

अहमदनगर :  वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून नेत्र दिव्यांग व मानसिक आजारपणाचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. अभिलेख तपासणीमध्ये ही बाब समोर आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी दिली. 

खेडकर यांच्या कारनाम्यांची नवनवीन माहिती प्रत्येक दिवशी समोर येत आहे. त्यांना नगर जिल्हा रुग्णालयाने दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने दिले होते. त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील जावक नोंद वहीमध्ये खेडकर यांना प्रमाणपत्र दिल्याची नोंद होती. त्यानंतर जिल्हा रुग्णालय प्रशासनाने कागदपत्रांची तपासणी केली असता २०१८ मध्ये ‘नेत्र दिव्यांग’ व २०२० मध्ये ‘मानसिक आजारी’ असल्याचे प्रमाणपत्र दिल्याची नोंद आढली आहे. वैद्यकीय मंडळाने २०२१ मध्ये प्रमाणपत्र दिल्याचे अभिलेखानुसार आढळले आहे, असे डॉ. घोगरे यांनी सांगितले. वैद्यकीय तपासण्यांच्या आधारे त्यांना ही प्रमाणपत्रे दिली त्या कागदपत्रांचा शोध सुरू आहे. 

‘नॉन क्रीमिलेअर’ही संशयाच्या फेऱ्यात 

 खेडकर यांच्या ‘दिव्यांग’ प्रमाणपत्रासोबतच ‘नॉन क्रीमिलेअर’ हे प्रमाणपत्रदेखील संशयाच्या फेऱ्यात अडकले आहे. त्यांनी एका मुलाखतीत आपले आई-वडील विभक्त असल्याचा दावा केला होता; परंतु, त्यांचे वडील दिलीप खेडकर यांनी लोकसभा निवडणुकीत अविभक्त कुटुंब असल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते. 

दीड किलो चांदी अर्पण 

अहमदनगर : पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेची उमेदवारी मिळावी यासाठी नगर जिल्ह्यात मोहटादेवीला दीड किलो चांदीचा मुकुट अर्पण करण्याचा नवस केला होता. पण त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली नाही.  बीड लोकसभा मतदारसंघातून मुंडे यांना उमेदवारी मिळाली. त्यावेळी दिलीप खेडकर व त्यांचे भाऊ माणिक खेडकर यांनी पंकजा मुंडे यांची मोहटादेवी गडावर पेढे तुला केली. तसेच त्यांच्या हस्ते दीड किलो चांदीचा मुकुट देवीला अर्पण केला.

 पूजा यांच्या मातोश्री मनोरमा यांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या नावे लिहिलेला १२ लाख १२ हजारांच्या धनादेशाची कॉपी व्हायरल झाली आहे. यासंदर्भात पंकजा मुंडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी