श्रीगोंद्यातील राजकीय चाणक्य हरपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:24 IST2021-07-14T04:24:39+5:302021-07-14T04:24:39+5:30

श्रीगोंदा : नेहमी संपर्कात असलेले आणि अचूक माहिती देणारे श्रीगोंद्याचे प्रा. तुकाराम दरेकर यांचे निधन झाल्याची माहिती ...

The political Chanakya of Shrigonda was lost | श्रीगोंद्यातील राजकीय चाणक्य हरपला

श्रीगोंद्यातील राजकीय चाणक्य हरपला

श्रीगोंदा : नेहमी संपर्कात असलेले आणि अचूक माहिती देणारे श्रीगोंद्याचे प्रा. तुकाराम दरेकर यांचे निधन झाल्याची माहिती समजली आणि मला धक्काच बसला. प्रा. दरेकर यांचे नाव राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या यादीत वरच्या क्रमांकावर होते. त्यांच्या रुपाने श्रीगोंद्यातील राजकीय चाणक्य, सहकारी हरपला, असा शोक संदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठवला आहे.

या शोक संदेशाचे वाचन प्रा. तुकाराम दरेकर यांच्या दशक्रिया विधी कार्यक्रमात करण्यात आले. पवार यांनी शोक संदेशात म्हटले आहे, प्रा. दरेकर हे शेती, शेतकरी, तरुण पिढी यांच्या भल्यासाठी काम करीत. कुठे अन्याय होत असेल तर संघर्ष करण्यासाठी ते पुढे असत.

श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्यामध्ये अनेक वर्षे उपाध्यक्ष, संचालक होते. त्यानंतर रयत शिक्षण संस्थेमध्ये त्यांचा सहभाग होता. रयत शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांची जी रयत बँक आहे, त्या बँकेवरसुध्दा ते अनेक वर्षे काम करत होते. सहकार, शिक्षण, शेतकी अशा विविध क्षेत्रात त्यांचा दबदबा होता. त्यांच्या निधनाने आम्ही एका चांगल्या सहकाऱ्याला मुकलो. दरेकर कुटुंबीयांवर फार मोठा आघात झाला आहे, अशा शब्दांत पवार यांनी दु:ख व्यक्त केले.

दरेकर यांच्या दशक्रिया विधीनिमित्त गणेश महाराज शिंदे यांचे प्रवचन झाले. यावेळी भगवान महाराज गिरमकर, आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा, मनोहर पोटे, केशव मगर, जिजाबापू शिंदे, राजेंद्र म्हस्के, प्रकाश कुतवळ, रावसाहेब खेडकर, सुनिल भोस, स्मितल वाबळे, मनोहर शहाजी मखरे, बाबासाहेब इथापे, पोपटराव खेतमाळीस, संजय जामदार, शरद यादव यांनी श्रध्दांजली अर्पण केली.

Web Title: The political Chanakya of Shrigonda was lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.