पोलिसांकडून ५१ जणांवर दंडात्मक कारवाई

By | Updated: December 5, 2020 04:33 IST2020-12-05T04:33:28+5:302020-12-05T04:33:28+5:30

कोपरगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर दंतात्मक कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार ...

Police take punitive action against 51 persons | पोलिसांकडून ५१ जणांवर दंडात्मक कारवाई

पोलिसांकडून ५१ जणांवर दंडात्मक कारवाई

कोपरगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर दंतात्मक कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार कोपरगाव तालुक्यातील पुणतांबा रोड, सडेफाटा परिसरात कोपरगाव तालुका पोलिसांनी बुधवारी (दि.२ डिसेंबर) ५१ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली आहे.

यामध्ये विनामास्क फिरणारे ३८, सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे ७ व फिजिकल डिस्टंसिंग न पाळणारे ६ अशा एकूण ५१ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करून सुमारे ५ हजार १०० रुपये दंडाची वसुली केली. सदर कारवाई कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दौलत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल आबासाहेब वाखुरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

Web Title: Police take punitive action against 51 persons