देवळाली प्रवरा येथे पोलीस ठाण्याला मंजुरी द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:37 IST2021-03-13T04:37:46+5:302021-03-13T04:37:46+5:30
विधानसभेच्या अधिवेशन दरम्यान कानडे यांनी या दोन्ही प्रश्नांना वाचा फोडली. तसे निवेदनही त्यांनी गृहमंत्र्यांना दिले. वाढत्या गुन्हेगारीला त्यामुळे आळा ...

देवळाली प्रवरा येथे पोलीस ठाण्याला मंजुरी द्यावी
विधानसभेच्या अधिवेशन दरम्यान कानडे यांनी या दोन्ही प्रश्नांना वाचा फोडली. तसे निवेदनही त्यांनी गृहमंत्र्यांना दिले. वाढत्या गुन्हेगारीला त्यामुळे आळा बसेल असा विश्वास कानडे यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यात शनिशिंगणापूर, आश्वी, वांबोरीसह अन्य ठिकाणी गेल्या काही वर्षांत नव्याने पोलीस ठाणे मंजूर झाले. मात्र लोकसंख्येने मोठे शहर असूनही देवळालीला मंजुरी मिळू शकली नाही. देवळाली येथे पोलीस ठाणे निर्मितीसाठी शासकीय जागा उपलब्ध आहे. मात्र अद्यापही हा प्रश्न सुटू शकलेला नाही. मात्र वाढती गुन्हेगारी लक्षात घेऊन आमदार कानडे यांनी या प्रश्नाला चालना देण्याचा प्रयत्न केला आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील प्रवरा नदीकाठची सहा गावे राहाता पोलीस ठाण्याशी जोडली गेली आहेत. या सर्व गावांची महसुली कामे श्रीरामपूर तहसील कार्यालयात होतात. मात्र न्यायालयीन कामकाजाकरिता त्यांना राहाता येथे जावे लागते. त्यामुळे ही तांत्रिक बाब दूर करून गावे श्रीरामपुरला जोडावीत असे कानडे यांनी अधिवेशनात सांगितले.
....
नव्याने प्रस्ताव पाठविणार
दरम्यान, नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी नुकतीच राहुरी पोलीस ठाण्यास भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी देवळाली पोलीस ठाण्याच्या निर्मितीसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आदेश जिल्हा पोलीस प्रशासनाला दिले. गृहविभागाकडे तसा प्रस्ताव यापूर्वीच गेलेला असला तरी आता त्यात दुरूस्ती करून नव्याने पाठविला जाणार आहे. त्यामुळे स्थानिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत