वाळू तस्करांकडून पोलिसांना धक्काबुक्की
By Admin | Updated: August 31, 2016 00:30 IST2016-08-31T00:20:38+5:302016-08-31T00:30:09+5:30
राहुरी : चिंचोली परिसरात प्रवरा नदीच्या पात्रात मंगळवारी पहाटे पोलीस निरिक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने छापा टाकला़ पोलिसांना

वाळू तस्करांकडून पोलिसांना धक्काबुक्की
राहुरी : चिंचोली परिसरात प्रवरा नदीच्या पात्रात मंगळवारी पहाटे पोलीस निरिक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने छापा टाकला़ पोलिसांना धक्काबुक्की करीत वाळू तस्कर फरार झाले़ पोलिसांनी जेसीबी, स्कार्पिओ, दोन टेम्पो व एक ट्रॅक्टर ताब्यात घेतला़
खबऱ्यामार्फत गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरिक्षक महावीर जाधव यांच्या नेतृत्वाखाली आठ पोलीस चिंचोली येथे दाखल झाले़
अंधारात वाळू उपसा सुरू असल्याचे आढळून आले़ पोलिसांना दहा-बारा व्यक्ती जेसीबीच्या सहाय्याने वाहनामध्ये वाळू टाकीत असताना दिसले़
पोलीस कर्मचारी राहुल कदम यांनी सोन्या उऱ्हाडे यांच्यावर झेप घेत पकडले़ अंधारात हिसका देऊन सोन्या फरार झाला़ कदम यांनी पाठलाग केला़ मात्र तो हाती लागु शकला नाही़ दहा बारा व्यक्तीही पळून गेल्या़
पथकातील पोलीस उपनिरिक्षक महावीर जाधव, ज्ञानेश्वर पथवे, राहुल कदम, काशीनाथ मरकड, भैरव अडांगळे यांनी वाळूची वाहने ताब्यात घेतली़ वाहने ताब्यात घेऊन राहुरी पोलीस स्टेशनमध्ये आणली़
(तालुका प्रतिनिधी)