नेवाशात दूध संकलन केंद्रावर पोलीसांचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 16:31 IST2017-09-13T16:31:02+5:302017-09-13T16:31:12+5:30
अहमदनगर : स्थानिक गुन्हे शाखा व अन्न, औषध प्रशासनाच्या पथकांनी नेवासा येथे दोन दूधसंकलन केंद्रावर छापा टाकून बनावट दूध ...

नेवाशात दूध संकलन केंद्रावर पोलीसांचा छापा
अहमदनगर : स्थानिक गुन्हे शाखा व अन्न, औषध प्रशासनाच्या पथकांनी नेवासा येथे दोन दूधसंकलन केंद्रावर छापा टाकून बनावट दूध तयार करण्याचे साहित्य जप्त केले. बुधवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
यावेळी पथकाने बनावट दूध तयार करण्याची पावडर व इतर साहित्य जप्त केले आहे. नेवासा येथे बनावट दूध तयार केले जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. अन्न, औषध प्रशासन व पोलीसांनी संयुक्त कारवाई करत दूध तयार करण्यासाठी वापरले जाणारे केमिकल्स, पावडर, दुधाच्या गोण्या व इतर साहित्य जप्त केले. यावेळी चौकशीसाठी पाच ते सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.