माजी सैनिकाच्या खून प्रकरणात पोलिसांचा हलगर्जीपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:19 IST2021-04-14T04:19:29+5:302021-04-14T04:19:29+5:30

पाथर्डी तालुक्यातील टाकळीफाटा येथे ६ एप्रिल रोजी हॉटेलसमोर गाडी उभी करण्याच्या कारणातून माजी सैनिक मच्छिंद्र कारभारी फुंदे यांना पाच ...

Police negligence in ex-soldier murder case | माजी सैनिकाच्या खून प्रकरणात पोलिसांचा हलगर्जीपणा

माजी सैनिकाच्या खून प्रकरणात पोलिसांचा हलगर्जीपणा

पाथर्डी तालुक्यातील टाकळीफाटा येथे ६ एप्रिल रोजी हॉटेलसमोर गाडी उभी करण्याच्या कारणातून माजी सैनिक मच्छिंद्र कारभारी फुंदे यांना पाच गुंडांनी मारहाण केली होती. त्यांना जबरदस्तीने गाडीत बसून पाथर्डी येथे आणत पुन्हा मारहाण केली होती. या घटनेनंतर फुंदे हे पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी आले होते. तेथे मात्र पोलिसांनी त्यांना ताटकळत बसून ठेवले. त्यांची तातडीने फिर्याद दाखल करून घेतली नाही. अखेर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना फुंदे यांचा मृत्यू झाला. दरम्यान, फुंदे यांना मारहाण करणाऱ्या सुधीर संभाजी सिरसाठ (वय २६, रा. आसरानगर, पाथर्डी), आकाश पांडुरंग वारे (वय २४, रा. शिक्षक कॉलनी पाथर्डी), आकाश मोहन डुकरे (वय २१, रा. विजयनगर पाथर्डी), गणेश सोन्याबापू जाधव (वय २३, रा. शंकरनगर पाथर्डी) यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी अटक केली. या गुन्ह्यात मात्र पाथर्डी पोलिसांनी हलगर्जी केल्याने, पोलीस अधीक्षक पाटील यांनी दोषींवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

Web Title: Police negligence in ex-soldier murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.