पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2016 23:39 IST2016-05-24T23:33:42+5:302016-05-24T23:39:39+5:30
अहमदनगर : राज्यातील पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी जारी करण्यात आले आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील पाच निरीक्षक जिल्ह्याबाहेर गेले

पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
अहमदनगर : राज्यातील पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी जारी करण्यात आले आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील पाच निरीक्षक जिल्ह्याबाहेर गेले असून तीन नवे निरीक्षक जिल्ह्यात येणार आहेत. तीन सहायक निरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्या आहेत.
राज्याच्या पोलीस मुख्यालयाने बदल्यांचे आदेश काढले. बदल्या झालेल्या पोलीस निरीक्षकांमध्ये सुरेश रंगनाथ बेंद्रे (विशेष सुरक्षा विभाग), संपत ज्ञानोबा भोसले (रायगड), विष्णू नाथा ताम्हाणे (एसीबी), शशिकांत पांडुरंग वाखारे आणि रामचंद्र जानबा देसाई (पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा) यांचा समावेश आहे. संपत सखाराम शिंदे (नांदेड), दिलीप शिशुपाल पवार (दौंड येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र) आणि रवींद्र देविदास निकाळजे (बुलडाणा) हे तीन निरीक्षक जिल्ह्यात आले आहेत. नगर येथील सहायक निरीक्षक मारुती नामदेव मुळुक (कोकण), राहुल बाबासाहेब गायकवाड (विशेष सुरक्षा विभाग) आणि पुरुषोत्तम वामन चोबे (राज्य गुन्हे अन्वेषण विभाग) यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्या आहेत. पोलीस उपनिरीक्षक (अभियांत्रिकी) गोकुळ गंगाराम पाटील यांची लातुरला बदली झाली आहे.
(प्रतिनिधी)