तपासात हलगर्जी केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक मानगावकर निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 13:09 IST2017-07-21T13:09:41+5:302017-07-21T13:09:41+5:30
गांजा प्रकरणी तपासात हलगर्जी केल्याने तोफखाना पोलीस ठाण्याचे निरिक्षक राकेश मानगावकर यांना निलंबित केले आहे़

तपासात हलगर्जी केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक मानगावकर निलंबित
आॅनलाइन लोकमत
अहमदनगर, दि़ २१- तस्करांकडून पकडलेल्या गांजा प्रकरणी तपासात हलगर्जी केल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी तोफखाना पोलीस ठाण्याचे निरिक्षक राकेश मानगावकर यांना निलंबित केले आहे़ गुरूवारी रात्री उशीरा हा आदेश पारित करण्यात आला़
गांजा प्रकरणात नगर शहरातील मुख्य डिलरला पकडण्यात आले नव्हते़ याबाबत थेट अक्षीक्षकांकडे तक्रारी झाल्या होत्या़ याप्रकरणाची सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ़ अक्षय शिंदे यांच्याकडे चौकशी देण्यात आली होती़ प्राथमिक चौकशीत मानगावकर दोषी आढल्याने शर्मा यांनी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस निरिक्षक विनय चौबे यांच्याकडे अहवाल पाठविला होता़ चौबे यांनी निलंबनाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे़ तोफखाना पोलीसांनी एक महिन्यापूर्वी शहरात १ कोटी १४ लाख रूपयांचा गांजा पकडला होता़ याप्रकरणी आतापर्यंत १४ आरोपींना अटक करण्यात आली आहे़ गांजा प्रकरणाची सविस्तर चौकशी सुरू असून, या प्रकरणात आणखी काही कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार आहे़
दरम्यान पाथर्डी पोलीस ठाण्यात वादग्रस्त ठरलेले पोलीस निरिक्षक पांडुरंग पवार यांची तोफखाना ठाण्यात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे़ कर्मचार्यांवर भोवण्याची शक्यता आहे. तोफखाना येथे पाथडीर्चे पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांची नियुक्ती करण्यात आली असून, पाथर्डीत शनिशिंगणापूरच्या राजेंद्र चव्हाण यांची बदली केली आहे. त्यांच्या जागी शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचे राजेंद्र चव्हाण यांची नियिुक्ती करण्यात आली आहे़