पोलीस निरीक्षकाची सहा लाख रुपयांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 17:27 IST2018-08-12T17:27:05+5:302018-08-12T17:27:18+5:30
शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोविंद भगवान ओमासे यांची सहा लाख वीस हजार रुपयांची फसवणूक झाली. फसवणूक केल्याच्या आरोपावरून शिवसंग्राम संघटनेचे शेवगाव तालुकाध्यक्ष नवनाथ हरिचंद्र इसारवाडे (रा.गदेवाडी ) याच्याविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षकाची सहा लाख रुपयांची फसवणूक
शेवगाव : शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोविंद भगवान ओमासे यांची सहा लाख वीस हजार रुपयांची फसवणूक झाली. फसवणूक केल्याच्या आरोपावरून शिवसंग्राम संघटनेचे शेवगाव तालुकाध्यक्ष नवनाथ हरिचंद्र इसारवाडे (रा.गदेवाडी ) याच्याविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसंग्राम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार विनायक मेटे यांचा हुबेहूब आवाज काढून ही फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नवनाथ इसारवाडे याने मी आमदार विनायक मेटे यांचा नातेवाईक आहे. त्यांच्या शिवसंग्राम पक्षाचा तालुकाध्यक्ष आहे, असे सांगून विश्वास संपादन करून मेटे वेळोवेळी कॉल केले. इसारवाडे व एक अज्ञात साथीदार यांनी संगनमत करून आमदार मेटे यांचा हुबेहूब आवाज काढून वेळोवेळी वेगवेगळ्या कारणांसाठी पैशाची मागणी केली. ओमासे यांच्याकडून ६ लाख २० हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी नवनाथ इसारवाडे व त्याच्या साथीदाराविरुध्द भा.दं.वि.कलम ४१९, ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरिक्षक नितीन मगर हे अधिक तपास करत आहेत.