बोठेला घेऊन पोलिसांकडून विविध स्थळांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:20 IST2021-03-19T04:20:23+5:302021-03-19T04:20:23+5:30

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बोठे याला १३ मार्च रोजी पोलिसांनी हैदराबाद येथून अटक केली. ...

Police inspected various places with their fingers | बोठेला घेऊन पोलिसांकडून विविध स्थळांची पाहणी

बोठेला घेऊन पोलिसांकडून विविध स्थळांची पाहणी

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बोठे याला १३ मार्च रोजी पोलिसांनी हैदराबाद येथून अटक केली. त्याला २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे. गेल्या चार दिवसांपासून तपासी अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, अपर पोलीस अधीक्षक साैरभकुमार अग्रवाल हे बोठे याची कसून चौकशी करत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनीही स्वत: त्याची चौकशी केली. ते स्वत: या तपासावर पूर्ण लक्ष ठेवून आहेत.

बोठे याने जरे यांची हत्या का व कशी केली? ही महत्त्वपूर्ण बाब पोलीस समजून घेत आहेत. दरम्यान, बोठे याने चौकशीत काय सांगितले, हे तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी जाहीर केलेले नाही.

दरम्यान, गुरुवारी रेखा जरे हत्याकांडाच्या कटाशी संबंधित काही स्थळांवर पोलिसांनी बोठे याला नेत तेथे प्रत्यक्ष पाहणी केली. पोलीस व्हॅनमधून बोठे याला या घटनास्थळांवर नेण्यात आले.

....

----------------------------

‘त्या’ आयफोनसाठी पोलीस घेणार फॉरेन्सिकची मदत

बाळ बोठे याचा आयफोन पोलिसांच्या ताब्यात आहे. हा फोन लॉक झाल्याने तो उघडला जात नाही. या फोनचा पासवर्ड आपल्याला आता आठवत नसल्याचे बोठे सांगत आहे. त्यामुळे हा फोन ओपन करण्यासाठी पोलीस आता फॉरेन्सिक एक्स्पर्टची मदत घेणार आहेत. हा फोन उघडल्यानंतर त्यातून पोलिसांना महत्त्वपूर्ण पुरावे मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: Police inspected various places with their fingers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.