शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तडीपार गुंडासोबत नाचला पोलीस दादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 14:29 IST

कायदा आणि सुव्यवस्थेची धुरा ज्याच्या खांद्यावर आहे तोच पोलीस मिरवणुकीत थेट तडीपारीची कारवाई झालेल्या गुंडासोबत मनसोक्त नाचून त्याच्यावर नोटा ओवाळून पैशांचे प्रदर्शन करतो़ याबाबतचा व्हायरल झालेला व्हिडिओ सध्या शहरात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे़ 

अहमदनगर : कायदा आणि सुव्यवस्थेची धुरा ज्याच्या खांद्यावर आहे तोच पोलीस मिरवणुकीत थेट तडीपारीची कारवाई झालेल्या गुंडासोबत मनसोक्त नाचून त्याच्यावर नोटा ओवाळून पैशांचे प्रदर्शन करतो़ याबाबतचा व्हायरल झालेला व्हिडिओ सध्या शहरात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे़ व्हायरल व्हिडिओत कोतवाली ठाण्यातील साध्या वेशातील पोलीस दादा आणि तडीपारीची कारवाई झालेला गुंड रशिद डंडा स्पष्टपणे दिसत आहेत़ कोतवाली आणि तेथील डिबी ब्रँच दोन वर्षांपासून चर्चेचा विषय ठरत आहे़ गुन्ह्यांचे प्रकटीकरण करण्यापेक्षा येथील कर्मचारी नको त्या भानगडीच जास्त करतात़ आता तर डिबीच्या एका दादाने कहरच केला़ मागील आठवड्यात शहरातून मोहरम विसर्जन मिरवणूक निघाली होती़ ही मिरवणूक येथील जुने कोर्ट परिसरात आली तेव्हा या दादाला चांगलाच ताल चढला़ इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी डोळ्यात तेल घालून मिरवणुकीवर लक्ष ठेवून होते़ तेव्हा हे साहेब डंडासोबत नाचण्यात दंग होते़ नाचतानाचता हातात नोटांचा बंडल घेऊन डंडाच्या डोक्यावरून नोटा ओवाळून वाटत होता़ रशिद डंडा याच्यावर कोतवाली आणि तोफखाना पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत़ नगर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा येऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने त्याचा प्रस्ताव तयार करून पाठविल्यानंतर जिल्हा प्रशासनाने त्याला शहरातून तडीपार केले आहे़ सध्या तो जामिनावर शहरात आला आहे़ मिरवणुकीत डंडा याला पाहून डिबीच्या दादाचे चांगलेच पे्रम उतू गेले अन् कुठलेच भान न ठेवत थेट डान्सच केला़ आता वरिष्ठ पोलीस अधिकारी यावर काय निर्णय घेतात़ याची प्रतीक्षा नगर शहरातील जनतेला आहे़ 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस