‘लोकमत’चे अंक पळविणाऱ्या आरोपींना पोलीस कोठडी
By Admin | Updated: May 20, 2016 00:29 IST2016-05-20T00:20:41+5:302016-05-20T00:29:27+5:30
कोपरगाव : गाडी आडवून वर्तमानपत्र लुटणाऱ्या सहा आरोपींना बुधवारी रात्री अटक करण्यात आली होती़ गुरूवारी त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली़

‘लोकमत’चे अंक पळविणाऱ्या आरोपींना पोलीस कोठडी
कोपरगाव : गाडी आडवून वर्तमानपत्र लुटणाऱ्या सहा आरोपींना बुधवारी रात्री अटक करण्यात आली होती़ गुरूवारी त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली़
तहसीलदार इंदिरा चौधरी यांच्यावर झालेल्या हल्लयाची बातमी वर्तमान पत्रात येईल़ त्यांची बदनामी होईल़ त्यामुळे महसूल कर्मचारी गोरख महाजन याने अन्य आरोपींच्या मदतीने ‘लोकमत’ पेपरचे गठ्ठे बुधवारी सकाळी बसस्थानकातून पळविले होते.
त्यानंतर सकाळ व सार्वमतचे पार्सल घेऊन येणाऱ्या गाड्या बेट नाक्याजवळ आडविल्या़ चालकाला दमदाटी करून पेपर पळविले़ घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक देवरे यांनी केला़
रात्री गोरख महाजन, अनिल उर्फ काळुअप्पा आव्हाड, नितीन चव्हाण, नितीन राऊत, राहुल रणशुर, रवि शिंदे यांना अटक केली़ या आरोपींना कोपरगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी काकड यांच्यापुढे उभे केले़ तेव्हा त्यांना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. याबाबत अधिकचा तपास पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)