दारू विक्रेत्यांवर पोलिसांची धडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:17 IST2020-12-25T04:17:21+5:302020-12-25T04:17:21+5:30

जामखेड : जामखेड पोलिसांची बेकायदा दारू विक्रेत्यावर धडक कारवाई सुरूच असून, साेमवारी जामखेड शहरातील अवैद्य देशी, विदेशी दारू विक्री ...

Police crack down on liquor dealers | दारू विक्रेत्यांवर पोलिसांची धडक कारवाई

दारू विक्रेत्यांवर पोलिसांची धडक कारवाई

जामखेड : जामखेड पोलिसांची बेकायदा दारू विक्रेत्यावर धडक कारवाई सुरूच असून, साेमवारी जामखेड शहरातील अवैद्य देशी, विदेशी दारू विक्री करणाऱ्या विविध हॉटेलवर जामखेड पोलिसांनी छापे टाकत कारवाई केली. विक्रेत्यांकडून १२ हजार ५०० रुपये किमतीचा बेकायदा दारूसाठा जप्त केला.

जामखेड शहरात विविध ठिकाणी अवैध देशी, विदेशी दारूची विक्री चालू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळाली असता त्यांनी पथकासह बीड रोडवरील हॉटेल कृष्णा, हॉटेल शिवराय, नगर रोडवरील हॉटेल कावेरी, हॉटेल समता, तसेच चुंबळी फाट्यावरील हॉटेल रसिका अशा ५ हॉटेलवर छापा टाकला. यात १२ हजार ५०० रुपये किमतीच्या देशी, विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या व हॉटेल चालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल गव्हाणे, पोलीस नाईक गणेश फुलमाळी, संग्राम जाधव, आबासाहेब आवारे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप राऊत, विजयकुमार कोळी, अविनाश ढेरे, संदीप आजबे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Web Title: Police crack down on liquor dealers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.