दरोडेखोरांच्या टोळीस उद्यापर्यंत पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 14:49 IST2017-08-29T14:49:08+5:302017-08-29T14:49:48+5:30

कोपरगाव : तालुक्यातील पढेगाव शिवारात दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या ६ जणांच्या टोळीला पोलिसांनी सापळा लावून जेरबंद केले आरोपींना न्यायालयात हजर केले असता ३० आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.

Police closet till dacoity gangs till tomorrow | दरोडेखोरांच्या टोळीस उद्यापर्यंत पोलीस कोठडी

दरोडेखोरांच्या टोळीस उद्यापर्यंत पोलीस कोठडी

ठळक मुद्देकोपरगावात धारदार हत्यारे जप्तपढेगाव शिवारात पोलिसांची कारवाई
ोपरगाव : तालुक्यातील पढेगाव शिवारात दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या ६ जणांच्या टोळीला पोलिसांनी सापळा लावून जेरबंद केले.पोलिसांची माहिती अशी, रविवार पहाटे सहा वाजेच्या सुमारास पढेगाव शिवारात पढेगाव ते शिरसगाव रस्त्यावरील ४५ चारी चौफुली येथे हिरू गडोदा भोसले (वय ३४), राहुल रोहम चव्हाण (वय १८), प्रदीप बापू चव्हाण (वय १९), आकाश प्रकाश भोसले (वय २०),भगीरथ बडोद भोसले, नामदेव बडोद भोसले (सर्व राहणार पढेगाव, तालुका कोपरगाव) हे दरोड्याची पूर्वतयारी करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साहेबराव कडनोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पढेगावात सापळा रचून या आरोपींना जेरबंद केले. त्यांच्याकडून एक चाकू, दोन कोयते, एक मिरची पूड, तसेच तीन दुचाकी जप्त केल्या. याप्रकरणी सहायक फौजदार रावसाहेब धीवर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता ३० आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. फौजदार तुरनर तपास करीत आहेत.

Web Title: Police closet till dacoity gangs till tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.