पोलिसांनी पकडले कोंबडीचोर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 13:39 IST2017-08-29T13:33:28+5:302017-08-29T13:39:23+5:30

श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलिसांनी गुन्हेगारांवर कारवाई करत दोन कोंबडीचोरांना अटक केली. तालुक्यातील शिवारातून शेळ्या व कोंबड्यासह आरोपींना कोळगाव शिवारातून ताब्यात  घेण्यास पोलिसांना यश आले

The police caught the poultry | पोलिसांनी पकडले कोंबडीचोर 

पोलिसांनी पकडले कोंबडीचोर 

ठळक मुद्देबेलवंडी पोलीसांची कारवाईकोळगाव शिवारातून अटक 

श्रीगोंदा (अहमदनगर) : श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलिसांनी गुन्हेगारांवर कारवाई करत दोन कोंबडीचोरांना अटक केली. तालुक्यातील शिवारातून शेळ्या व कोंबड्यासह आरोपींना कोळगाव शिवारातून ताब्यात  घेण्यास पोलिसांना यश आले. पोलिसांनी हुल्या उर्फ संदीप्या पंडीत्या भोसले, पंडीत्या चाफ्या भोसले या दोघा आरोपींना अटक केली असून संज्या पंडीत्या भोसले पळून गेला. 


बेलवंडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक ललीत पांडुळे यांच्या पथकाने सोमवारी कोळगाव येथील तोंडेवाडी शिवारात छापे टाकले. या छाप्यादरम्यान छगन मोरे यांच्या चोरलेल्या दोन शेळ्या व इतर मुद्देमाल सापडला. तसेच सुपा परीसरात चोरी केलेल्या शेळ्याही सापडल्या. याप्रकरणी पोलिसांनी हुल्या उर्फ संदीप्या पंडीत्या भोसले, पंडीत्या चाफ्या भोसले या दोघा आरोपींना अटक केली. मात्र संज्या पंडीत्या भोसले पळून गेला. २४ आॅगस्टच्या रात्री एरंडोली येथील म्हसोबा खिंडीजवळ राहणारे छगन बबन मोरे यांचे घरातून तीन चोरट्यांनी दहा हजाराची रोकड, एक मनीमंगळसूत्र, दोन शेळ्या आणि कोंबड्यांची चोरी केली होती. सोमवारी पोलीस निरीक्षक पांडुळे यांच्यासह हवालदार रामकीसन साबळे, पो.कॉ. मोढळे, क्षीरसागर, माने व देशमुख यांनी ही कारवाई केली. 

Web Title: The police caught the poultry