खाकीबाच्या जत्रा उत्सवात पोलिसांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 16:53 IST2019-07-18T16:51:42+5:302019-07-18T16:53:26+5:30

श्रीगोंदा येथील खाकीबा डोंगरावरील आषाढ जत्रेत तळीरामांनी थेट  पोलिसांवर हल्ला चढविला.

Police attack on Khakiba festival | खाकीबाच्या जत्रा उत्सवात पोलिसांवर हल्ला

खाकीबाच्या जत्रा उत्सवात पोलिसांवर हल्ला

श्रीगोंदा : श्रीगोंदा येथील खाकीबा डोंगरावरील आषाढ जत्रेत तळीरामांनी थेट  पोलिसांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात पोलीस कर्मचारी संजय कोतकर गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली.

आषाढ महिन्याच्या निमित्ताने खाकीबा डोंगरावर खाकीबाचा उत्सव भरतो. त्याठिकाणी बोकडांचा बळी आणि दारूचा पूर येतो. त्यामुळे खाकीबाची जत्रा प्रसिद्ध आहे. या ठिकाणी बंदोबस्तासाठी गेलेले पोलीस संजय कोतकर वाहतूक नियंत्रणात आणत होते. याचवेळी पाच- सहा तळीरामांनी संजय कोतकर यांना बेदम मारहाण केली. घटनेची माहिती समजताच श्रीगोंदा पोलिस खाकीबाकडे रवाना झाली आहे.

 

Web Title: Police attack on Khakiba festival