गर्दी जमलेल्या लग्नसोहळ्यावर पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:16 IST2021-05-03T04:16:12+5:302021-05-03T04:16:12+5:30

शहरातील भिस्तबाग चौक परिसरातील प्रशांत कॉलनी येथे रविवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास तोफखाना पोलिसांनी ही कारवाई केली. ५० ते ...

Police action on a crowded wedding | गर्दी जमलेल्या लग्नसोहळ्यावर पोलिसांची कारवाई

गर्दी जमलेल्या लग्नसोहळ्यावर पोलिसांची कारवाई

शहरातील भिस्तबाग चौक परिसरातील प्रशांत कॉलनी येथे रविवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास तोफखाना पोलिसांनी ही कारवाई केली. ५० ते ६० लोकांच्या उपस्थितीत लग्नसमारंभ सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावेळी पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, साहाय्यक निरीक्षक किरण सुरसे यांनी पथकासह जाऊन पाहणी केली. तेव्हा नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. मुलीच्या घरी हा लग्नसोहळा आयोजित केला असल्याने पोलिसांनी वधूपित्याला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. नगर शहरासह जिल्ह्यात दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. नगर शहरात अनेक ठिकाणी मात्र पोलिसांची नजर चुकवून कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अशा लोकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढविली आहे.

Web Title: Police action on a crowded wedding