पोखर्डीत दरोडा

By Admin | Updated: April 16, 2024 12:35 IST2014-09-13T22:38:58+5:302024-04-16T12:35:20+5:30

अहमदनगर : शेंडी-पोखर्डीजवळील निमसे वस्तीवर शुक्रवारी (दि.१२) मध्यरात्रीनंतर एक वाजता अज्ञात चोरट्यांनी निमसे कुटुंबियांना मारहाण करून दोन लाख रुपये रोख आणि सोन्याचे दागिने पळवून नेले.

Pokhurdy Raid | पोखर्डीत दरोडा

पोखर्डीत दरोडा

अहमदनगर : शेंडी-पोखर्डीजवळील निमसे वस्तीवर शुक्रवारी (दि.१२) मध्यरात्रीनंतर एक वाजता अज्ञात चोरट्यांनी निमसे कुटुंबियांना मारहाण करून दोन लाख रुपये रोख आणि सोन्याचे दागिने पळवून नेले.
शेंडी-पोखर्डीजवळील निमसे वस्ती येथे संदीप रमेश निमसे (वय २२) हे कुटुंबियांसमवेत घरातच झोपलेले असताना शुक्रवारी मध्यरात्रीनंतर सात ते आठ अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडून घरात शिरले. चाकू, लाकडी दांडके, लोखंडी कटावणीने त्यांनी धाक दाखवून मारहाण केली. त्यात संदीप निमसे, बाबासाहेब बबनराव निमसे, वैशाली बाबासाहेब निमसे हे जखमी झाले. घरातील १ लाख ८५ हजार रुपये, सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबविले़ घराचा दरवाजा बाहेरुन बंद करुन धूम ठोकली़ संदीप निमसे यांच्या फिर्यादीवरून एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास स़पो़नि़ किरणकुमार बकाले करीत आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Pokhurdy Raid