नगरच्या सुवर्णविश्वात अढळ स्थान निर्माण करण्यात पोखरणा यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:19 IST2021-03-15T04:19:59+5:302021-03-15T04:19:59+5:30
सर्जेपुरा येथील साईदीप टॉवरमध्ये दुसऱ्या शाखेची मुहूर्तमेढ रोवली आहे. रविवारी (दि. १४) या दालनाचा शुभारंभ ओमप्रकाश रांका, माजी ...

नगरच्या सुवर्णविश्वात अढळ स्थान निर्माण करण्यात पोखरणा यशस्वी
सर्जेपुरा येथील साईदीप टॉवरमध्ये दुसऱ्या शाखेची मुहूर्तमेढ रोवली आहे. रविवारी (दि. १४) या दालनाचा शुभारंभ ओमप्रकाश रांका, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, आमदार संग्राम जगताप, सीए सुहास बोरा, हिरालालजी पोखरणा, सोनीबाई पोखरणा यांच्या शुभहस्ते झाला. यावेळी गिरीश मेहेर, संचालक अनिल पोखरणा, अमित पोखरणा, आकाश पोखरणा, सचिन गुगळे, सतीश बोरा, मर्चंटस् बँकेचे चेअरमन आनंदराम मुनोत, माजी नगरसेवक संजय चोपडा, आदेश चंगेडिया, वसंत पोखरणा, नयन पोखरणा, नगरसेवक सचिन शिंदे, सचिन जाधव उपस्थित होते. ललितप्रभजी महाराज यांनी ऑनलाईन आशीर्वाद दिले.
अनिल पोखरणा म्हणाले, २००६ ला नवीपेठेत सुवर्णदालन सुरू केल्यावर सुरुवातीपासूनच सर्वोत्कृष्ट सुवर्ण अलंकार, देशाच्या कानाकोपऱ्यातील व्हरायटी उपलब्ध करून दिली. हॉलमार्क प्रणीत दागिने व सर्वांत कमी मजुरी दर अशी सेवा देत ग्राहकांची मने जिंकली. ग्राहकांचे प्रेम, आपुलकी व विश्वासामुळे चार हजार स्क्वेअर फुटांच्या प्रशस्त सुवर्णदालनाची भक्कम पायाभरणी झाली आहे. अमित पोखरणा म्हणाले, नगर शहरात सर्वांत कमी मजुरी दर आमच्या दालनात आहे. वसंत पोखरणा यांनी आभार मानले.
(वा.प्र.)