ग्रंथमित्र पुरस्काराने कवी संदीप राठोड सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:28 IST2021-02-05T06:28:14+5:302021-02-05T06:28:14+5:30
निघोज : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि काषाय प्रकाशन पुणे या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...

ग्रंथमित्र पुरस्काराने कवी संदीप राठोड सन्मानित
निघोज : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि काषाय प्रकाशन पुणे या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथमित्र पुरस्काराने कवी संदीप राठोड यांना नुकतेच सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेच्या कार्याचा इतिहास तसेच ४० वर्षांच्या खडतर प्रवासाचे यथोचित वर्णन करणारे डॉ. नयन चंद्र सरस्वते लिखित ‘बंधुता व संघर्ष’ या ग्रंथाचे प्रकाशन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथमित्र पुरस्काराचे वितरण माजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद संस्थापक अध्यक्ष प्रकाश रोकडे, प्रा. अशोककुमार पगारिया, काषाय प्रकाशनचे संचालक कवी प्रा. चंद्रकांत वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर कवी संदीप राठोड म्हणाले, पुरस्कार स्वीकारताना आई, मोठे बंधू उपस्थित होते. ऊसतोड मजुराच्या लेकराचा झालेला सन्मान पाहून आईच्या डोळ्यांतून ओघळणाऱ्या आनंदाश्रूंनी काळीज गहिवरून आले. साहित्य सेवेबद्दल लेखणीचा झालेला गौरव नक्कीच जबाबदारी वाढविणारा आहे. तसेच मिळालेला ग्रंथमित्र पुरस्कार आनंद देण्याबरोबर नवनिर्मितीला चालना देणारा आहे.
फोटो : ३१ निघोज१
पुणे येथे पुरस्कार सोहळ्याप्रसंगी ग्रंथमित्र पुरस्काराने सन्मानित कवी संदीप राठोड यांच्यासह त्यांच्या मातोश्री.