कवियत्री खोजे यांचे जिल्ह्याच्या साहित्य क्षेत्रात मोठे योगदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:45 IST2021-09-02T04:45:48+5:302021-09-02T04:45:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : दिवंगत कवियत्री संजीवनी खोजे यांचे नगर जिल्ह्याच्या साहित्य क्षेत्रात मोठे योगदान होते. त्यांच्याबद्दल कृतज्ञता ...

कवियत्री खोजे यांचे जिल्ह्याच्या साहित्य क्षेत्रात मोठे योगदान
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : दिवंगत कवियत्री संजीवनी खोजे यांचे नगर जिल्ह्याच्या साहित्य क्षेत्रात मोठे योगदान होते. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्यांच्या स्मृतींचा जागर करण्यासाठी कवयित्री संजीवनी खोजे स्मृती कार्यक्रमाचे आयोजन केले असून, यापुढे दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर यांनी केले.
रसिक ग्रुप, शब्दगंध साहित्यिक परिषद व संजीवनी खोजे मित्र मंडळाच्यावतीने कोहिनूर मंगल कार्यालयात रविवारी सायंकाळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, ज्ञानदेव पांडुळे, लेखिका प्रा. मेधाताई काळे, कवी चंद्रकांत पालवे, प्रा. डॉ. बाबूराव उपाध्ये, सुरेश चव्हाण व दिलीप खोजे, आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
येलुलकर म्हणाले, संजीवनी खोजे यांना आपल्यातून जाऊन २९ वर्षे झाली. गेली २५ वर्षे त्यांच्या नावाने कवितेसाठी स्मृती पुरस्कार व कवितेचा जागर नगरमध्ये होत होता. साहित्य रसिक शशिकांत मुथा यांनी सलग २५ वर्षे या कार्यक्रमासाठी मोठे योगदान दिले. भविष्यकाळात मसाप सावेडी शाखा, शब्दगंध साहित्यिक परिषद व रसिक ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार येईल, असे येलूलकर यांनी जाहीर केले.
कवयित्री नीलिमा बंडेलु, ऋता ठाकूर, संगीता फासाटे व खोजे परिवाराचाही यावेळी सत्कार करण्यात आला. डी. एम. कांबळे, प्रा. मेधाताई काळे, चंद्रकांत पालवे, प्रा. डॉ. बाबूराव उपाध्ये यांनी आपल्या मनोगताद्वारे कवयित्री संजीवनी खोजे यांच्या गत स्मृतींना उजाळा दिला. शारदा होशिंग व स्नेहल उपाध्ये यांनी संजीवनीच्या कवितांचे सादरीकरण केले. बंडेलु, संगीता फासाटे, ऋता ठाकूर, हेमलता पाटील, आरती होशिंग, सतीश डेरेकर, वसंत डंबाळे, मच्छिंद्र मालुंजकर, ल. धो. खराडे, हबीब पेंटर, दिलीप शहापूरकर, अमोल बागुल, राजेश सटाणकर यांनी आपल्या कविता सादर केल्या. या कार्यक्रमास प्रा. डॉ. च. वि. जोशी, चित्रकार श्रीधर अंभोरे, नंदकिशोर आढाव, गजेंद्र क्षीरसागर, जालिंदर बोरुडे, शैलेश राजगुरू, कृष्णकांत लोणे, आदी उपस्थित होते. राजेंद्र उदागे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
फोटो- ३० पुरस्कार
ओळी :- संजीवनी खोजे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करताना प्रा. मेधाताई काळे, कवी चंद्रकांत पालवे, प्रा. डॉ. बाबूराव उपाध्ये, सुरेश चव्हाण व दिलीप खोजे शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, जयंत येलूलकर, ज्ञानदेव पांडुळे, आदी उपस्थित होते.