नाट्यगृहासाठी नाट्यकलावंतांच्या सूचना मौलिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:19 IST2021-01-18T04:19:45+5:302021-01-18T04:19:45+5:30

अहमदनगर : सावेडी नाट्यगृहाच्या इमारतीबाबत शहरातील नाट्य कलावंतांची मते जाणून घेतली असून, कलावतांनी काही महत्त्वाचे बदल सुचविले आहेत. त्यानुसार, ...

The playwright's suggestions for the theater are original | नाट्यगृहासाठी नाट्यकलावंतांच्या सूचना मौलिक

नाट्यगृहासाठी नाट्यकलावंतांच्या सूचना मौलिक

अहमदनगर : सावेडी नाट्यगृहाच्या इमारतीबाबत शहरातील नाट्य कलावंतांची मते जाणून घेतली असून, कलावतांनी काही महत्त्वाचे बदल सुचविले आहेत. त्यानुसार, कामात बदल करण्यात येतील, असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.

सावेडी नाट्यगृहाच्या इमारतीसाठी शासनाकडून ५ कोटी रुपये महापालिकेकडे वर्ग करण्यात आले आहे. निधीअभावी हे काम थांबले होते. या कामाला गती मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांनी शहरातील नाट्य कलावंतांसह इमारतीची नुकतीच पाहणी केली. यावकळी रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर, अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचे प्रमुख समन्वयक शशिकांत नजान, नाट्य परिषदेचे अध्यक्ष अमोल खोले, नियामक मंडळाचे सदस्य सतीश शिंगटे, ज्येष्ठ रंगकर्मी पी.डी.कुलकर्णी, सदानंद भणगे, श्रेणीक शिंगवी, शिरीष मोडक, युवा रंगकर्मी क्षितिज झावरे, स्वप्निल मुनोत, निनाद बेडेकर, देवशीष शेडगे, अभय गोले, प्रा.ज्योती कुलकर्णी, नाट्यकर्मी प्रशांत जठार, संजय लोळगे, अनंत रिसे, पुष्कर तांबोळी, वैभव कुऱ्हाडे, दत्ता पवार, अविनाश कराळे, अभिजित दळवी, सुदर्शन कुलकर्णी, स्वप्निल नजान, चाणक्य नेहुल, गजेंद्र क्षीरसागर, पराग पाठक, स्नेहल उपाध्ये, दीपाली देऊतकर, नंदकिशोर आढाव, बाळासाहेब नरसाळे, शैलेश राजगुरू माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, डॉ.सागर बोरुडे, निखिल वारे, बाळासाहेब पवार, उद्योजक अमोल गाडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अभिजीत खोसे, सुमित कुलकर्णी, अभियंता एम.एस. पारखे, वैभव जोशी ठेकेदार संस्थेचे रसिक मुथ्था आदी उपस्थित हाेते.

जगताप म्हणाले, नागरी सुविधांबरोबर संस्कृती जतन करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील सर्वोत्तम नाट्यगृह नगर शहरात उभे राहावे, यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे जगताप म्हणाले. शहरातील नाट्य कलाकारांनी नाट्यगृहाची इमारत कशी असावी, त्यात काय सुधारणा हव्यात, याबाबत सूचना कराव्यात. नाट्य कलावंतांच्या सूचनेनुसार काही बदल करण्यात येतील, असे जगताप म्हणाले.

....

सूचना फोटो आहे.

Web Title: The playwright's suggestions for the theater are original

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.