खेळाडू वृत्ती स्वच्छ विचारांना प्रेरित करते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:40 IST2021-02-05T06:40:25+5:302021-02-05T06:40:25+5:30
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील हनुमान मंदिर ट्रस्ट मैदानावर शिवसूत्र युवा प्रतिष्ठान वतीने प्लास्टीक बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात ...

खेळाडू वृत्ती स्वच्छ विचारांना प्रेरित करते
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील हनुमान मंदिर ट्रस्ट मैदानावर शिवसूत्र युवा प्रतिष्ठान वतीने प्लास्टीक बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी (दि.२९) भारत सरकारचे स्वच्छतादूत व कोविड योद्धा सुशांत घोडके यांच्या हस्ते व प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ.अनंतकुमार भांगे यांचे प्रमुख उपस्थितीत झाला. या स्पर्धेत सुमारे ४० क्रिकेट संघांनी सहभाग घेतला आहे.
घोडके म्हणाले, खेळात प्रतिस्पर्धी कितीही चाणाक्ष आणि त्या समावेत सामावलेले ताकदवान असले, तरी सर्वसामान्य प्रेक्षक बनून डोळसपणे पहात असलेली जनता आपलीही फलंदाजी त्याच उत्साहात पहात असते. अशा वेळी खरा कस लागतो. सर्वच खेळात जय-पराजय, मान-अपमान सुरू असतात. त्यामुळे खचून न जाता, प्रत्येक क्षण नव्या उमेदीने जगायला शिकले पाहिजे. याप्रसंगी डॉ.अनंतकुमार भांगे, जवान धनराज चव्हाण, ज्येष्ठ क्रीडापटू बाळासाहेब वक्ते यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी रंगनाथ वक्ते, दीपक गायकवाड, पाटीलबा वक्ते, भीमराज वक्ते, केशवराव होन, धोंडीराम वक्ते, बापुराम वक्ते, कल्याण गुरसळ, तुषार गुरसळ, दादा वक्ते, पांडुरंग वक्ते, जालिंधर वक्ते, संजय भोंगळे, पोलीस पाटील बाबासाहेब गायकवाड, किशोर वक्ते, यशवंत आव्हाड, गोरख चव्हाण, पप्पू इंगले, संजय वक्ते, बाळासाहेब पवार, आकाश देवकर, शिवसूत्र युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुधाकर वक्ते, उपाध्यक्ष विशाल गुरसळ, सदस्य राहुल वक्ते, प्रदीप गायकवाड, विकी चव्हाण, ऋषिकेश गुरसळ, अक्षय गुरसळ, कुलदीप वक्ते उपस्थित होते.
....................
फोटो २९- क्रिकेट स्पर्धा उद्घाटन - कोपरगाव