संगमनेरात ४५ दात्यांनी केला प्लाझ्मा दान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:15 IST2021-05-03T04:15:24+5:302021-05-03T04:15:24+5:30
डॉ. गांधी म्हणाले, कोरोनाबाधित रुग्णांना अत्यवस्थ अवस्थेतील परिस्थितीत महागड्या औषधांची कमतरता भासत असताना कोरोनातून बरे झालेल्यांच्या रक्तातील प्लाझ्मा उपयुक्त ...

संगमनेरात ४५ दात्यांनी केला प्लाझ्मा दान
डॉ. गांधी म्हणाले, कोरोनाबाधित रुग्णांना अत्यवस्थ अवस्थेतील परिस्थितीत महागड्या औषधांची कमतरता भासत असताना कोरोनातून बरे झालेल्यांच्या रक्तातील प्लाझ्मा उपयुक्त ठरत रुग्णांना जीवदान मिळत असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे प्लाझ्माची मागणी वाढली आहे. परंतु या बाबतीत नागरिकांना खूप कमी माहिती आहे. समाजात प्लाझ्मा दान करण्याबाबत जागृती निर्माण व्हावी. तसेच अत्यवस्थ कोरोना रुग्णांना प्लाझ्मा सहज उपलब्ध व्हावा. या हेतूने अर्पण रक्तपेढीच्या सहकार्याने लायन्स क्लब ऑफ संगमनेरच्यावतीने प्लाझ्मा दान शिबिराचे आयोजन केले होते. कर्तव्यम् फाऊंडेशनचे तुषार ओहरा यांनी यासाठी सक्रिय योगदान दिले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी क्लबच्या अध्यक्षा बबिता आसावा, सचिव सुनीता पगडाल, खजिनदार सपना शहा, प्रकल्पप्रमुख राणीप्रसाद मुंदडा, क्लबचे संचालक विलास क्षत्रिय, श्रीनिवास पगडाल, संजय आसावा, वैभव शहा, डॉ. अबोली गांधी आदींनी विशेष परिश्रम घेतले.