नगर परिसरात वनौषधी व दुर्मिळ वृक्षांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:15 IST2021-07-10T04:15:43+5:302021-07-10T04:15:43+5:30
यात धरमपुरी, गोरक्षनाथ गड, चांदबीबी महाल परिसर, आगडगाव, बुऱ्हाणनगर, आयुर्वेद धन्वंतरी उद्यान, मारुतरावजी घुले पाटील कला, वाणिज्य व शास्त्र ...

नगर परिसरात वनौषधी व दुर्मिळ वृक्षांची लागवड
यात धरमपुरी, गोरक्षनाथ गड, चांदबीबी महाल परिसर, आगडगाव, बुऱ्हाणनगर, आयुर्वेद धन्वंतरी उद्यान, मारुतरावजी घुले पाटील कला, वाणिज्य व शास्त्र महाविद्यालय आदी ठिकाणी वनौषधी तसेच काही दुर्मिळ वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे.
यावर्षी संस्थेने दुर्मिळ होत चाललेला पिवळा पळस याची लागवड करण्याकरिता विशेष परिश्रम घेतले आहेत. स्थानिकांना सोबत घेऊन ही चळवळ अधिकाधिक व्यापक करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे फाउंडेशनचे रोहन चाटे यांनी सांगितले.
या उपक्रमांतर्गत धावडा, सीता अशोक, अर्जुन सादडा, कांचन, मुचुकुंद, बकुळ, लाल पळस, पिवळा पळस, शिरीष, आवळा, बेहडा, हिरडा, वड, कदंब, ताम्हण अशा बहुउपयोगी तसेच औषधी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. झाड लावताना स्थानिकांना त्या वृक्षाची माहिती देणे, त्याचे औषधी उपयोग सांगणे आणि रोपाची पूर्ण वाढ होईपर्यंत त्याचे व्यवस्थित संगोपन करणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमात दीप्ती चाटे, शुभदा चाटे, डॉ. शर्वरी पारगावकर, माधुरी गोहाड सहभागी झाल्या होत्या.
----------
फोटो - ०९मोक्ष फाउंडेशन