राहुरी नगरपरिषदेकडून २,११० झाडांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:25 IST2021-08-20T04:25:42+5:302021-08-20T04:25:42+5:30
घनकचरा व्यवस्थापन केंद्र, राहुरी येथे १,६५० व जोगेश्वरी स्मशानभूमी येथे ११० झाडे लावण्यात आली. गुरुवारी पुरुषोत्तम नगर, आत्तार मळा ...

राहुरी नगरपरिषदेकडून २,११० झाडांची लागवड
घनकचरा व्यवस्थापन केंद्र, राहुरी येथे १,६५० व जोगेश्वरी स्मशानभूमी येथे ११० झाडे लावण्यात आली. गुरुवारी पुरुषोत्तम नगर, आत्तार मळा परिसर व कोर्ट रोड परिसरात ३५० झाडे लावण्यात आली. यावेळी अध्यक्ष अनिल कासार, उपाध्यक्ष नंदा उंडे, मुख्याधिकारी, सचिन बांगर, नगरसेवक बाळासाहेब उंडे व सामान्य प्रशासन विभागाचे प्रमुख विकास घटकांबळे, कर विभाग प्रमुख महेंद्र ताकपिरे, नोडल अधिकारी सुभाष बाचकर, उद्यान विभाग प्रमुख शंकर आगलावे तसेच संगणक अभियंता भरत मोरे व आरोग्य विभाग प्रमुख राजेंद्र पवार व संतोष त्रिभुवन, भाऊसाहेब हिंगे उपस्थित होते. झाडे लावताना भारतीय प्रजातीची झाडे लावण्यात येत असून प्रामुख्याने वड, पिंपळ, लिंब, काशिद, चिंच, बकुळ व कदंब या सारख्या झाडांची लागवड करण्यात आली आहे.