१ हजार १११ वटवृक्षाच्या रोपांचे रोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:15 IST2021-06-24T04:15:36+5:302021-06-24T04:15:36+5:30

थोर स्वातंत्र्यसेनानी, सहकारमहर्षी दिवंगत भाऊसाहेब थोरात यांनी पुढील पिढ्यांच्या निरोगी जीवनासाठी दंडकारण्य अभियान सुरू केले. याअंतर्गत गेल्या पंधरा वर्षांमध्ये ...

Planting of 1 thousand 111 banyan trees | १ हजार १११ वटवृक्षाच्या रोपांचे रोपण

१ हजार १११ वटवृक्षाच्या रोपांचे रोपण

थोर स्वातंत्र्यसेनानी, सहकारमहर्षी दिवंगत भाऊसाहेब थोरात यांनी पुढील पिढ्यांच्या निरोगी जीवनासाठी दंडकारण्य अभियान सुरू केले. याअंतर्गत गेल्या पंधरा वर्षांमध्ये तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून संवर्धन करण्यात आले आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका व परिसरात वृक्षसंवर्धन संस्कृती वाढीस लागली आहे. वटसावित्री पौर्णिमेनिमित्त वटवृक्षाच्या रोपांचे रोपण करण्यात येणार आहे. प्रत्येक गावामध्ये किमान पाच वृक्षांचे रोपण करण्यात येणार असून, त्याची संवर्धनाची जबाबदारी तेथील स्थानिक महिलांना देण्यात आली आहे. प्रत्येकाने दरवर्षी एका वृक्षाचे रोपण करून त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. गृहिणी ही घरातील अत्यंत महत्त्वाची मार्गदर्शिका असून, भारतीय संस्कृतीतील समृद्ध व परंपराशाली असल्येल्या वटसावित्री पौर्णिमेनिमित्ताने वृक्षारोपण करण्यात येणार आहे, असेही तांबे म्हणाल्या.

Web Title: Planting of 1 thousand 111 banyan trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.