सिध्दिविनायक वसाहतीत वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:15 IST2021-06-29T04:15:44+5:302021-06-29T04:15:44+5:30
अहमदनगर : महापालिकेच्या टच फाउंडेशन, भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या संयुक्त विद्यमान सावेडी नाका येथील सिध्दिविनायक कॉलनी येथे वृक्षारोपण ...

सिध्दिविनायक वसाहतीत वृक्षारोपण
अहमदनगर : महापालिकेच्या टच फाउंडेशन, भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या संयुक्त विद्यमान सावेडी नाका येथील सिध्दिविनायक कॉलनी येथे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी बाबासाहेब वाकळे, सभागृह नेते रवींद्र बारस्कर, टच फाउंडेशनचे विराज मुनोत, प्रशांत जठार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक अरविंद चाबूकस्वार, ज्ञानेश्वर शहाणे, भानुदास जोशी, डॉ. मनोहर देशपांडे, तेजसभाई पटेल, प्रकाश पटेल, अशोक काजळे, अंकुश गोळे, कुलदीप कुलकर्णी आदी उपस्थित होते.
यावेळी सभागृह नेते बारस्कर म्हणाले की, प्रभाग क्र. ६ मध्ये नागरिकांच्या सहकार्यातून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व संवर्धन केले जाणार आहे. प्रभागातील नागरिकांना वृक्षदत्तक योजना राबवून हरित प्रभाग करणार आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज बनली आहे. कोरोनाच्या काळामध्ये सर्वांना ऑक्सिजनचे महत्त्व समजले आहे. कोरोना रुग्णांना विकत कृत्रिम ऑक्सिजन दिला जात होता. झाडांमुळे नैसर्गिक ऑक्सिजन मिळेल.
..
सूचना: २८ बारस्कर