निघोजच्या मुलिकादेवी महाविद्यालयात वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:25 IST2021-08-14T04:25:58+5:302021-08-14T04:25:58+5:30
निघोज : निघोज (ता.पारनेर) येथील मुलिकादेवी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे शांतिनिकेतन वाचनालय व वनस्पती उद्यानात परिसरातील पत्रकारांच्या ...

निघोजच्या मुलिकादेवी महाविद्यालयात वृक्षारोपण
निघोज : निघोज (ता.पारनेर) येथील मुलिकादेवी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे शांतिनिकेतन वाचनालय व वनस्पती उद्यानात परिसरातील पत्रकारांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. हा उपक्रम मुलिकादेवी महाविद्यालय व पत्रकारांच्या वतीने राबविण्यात आला.
यामधे आंबा, सीताफळ, जांभूळ, चिकू या झाडांचा समावेश आहे. यावेळी पारनेर तालुका पत्रकार संघाचे मार्गदर्शक दत्ता उनवणे, उपाध्यक्ष संतोष इधाटे, राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल चौधरी, पारनेर तालुका पत्रकार संघाचे कार्यकारणी सदस्य भास्कर कवाद, कारभारी बाबर, शिरीष शेलार, विजय रासकर, बाबाजी वाघमारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सहदेव आहेर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.गोविंद देशमुख, प्रा.विशाल रोकडे, आनंद पाटेकर, संदीप लंके, अक्षय अडसूळ, पोपट सुंबरे, सचिन निघुट, प्रीती कार्ले, नीलिमा घुले, केशर झावरे, अंजली बोठे, अश्विनी सुपेकर, पोपट पठारे, अशोक कवडे, सोनाली काळे, आकांक्षा रोकडे, नवनाथ घोगरे, संदीप लंके, अक्षय घेमुड, किशोर बाबर उपस्थित होते.
----
१३ मुलिकादेवी
निघोज येथील मुलिकादेवी महाविद्यालयात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.