कर्जत पोलीस ठाण्यात वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:25 IST2021-08-28T04:25:02+5:302021-08-28T04:25:02+5:30

कर्जत : तालुका पत्रकार संघ, कर्जत तालुका प्रेस क्लब, पोलीस स्टेशन व थेरगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत ...

Plantation at Karjat Police Station | कर्जत पोलीस ठाण्यात वृक्षारोपण

कर्जत पोलीस ठाण्यात वृक्षारोपण

कर्जत : तालुका पत्रकार संघ, कर्जत तालुका प्रेस क्लब, पोलीस स्टेशन व थेरगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत पोलीस स्टेशन व परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

थेरगाव ग्रामपंचायतीने चालू वर्षी ‘माझी वसुंधरा’ अभियानात भाग घेतला आहे. या अभियानांतर्गत कर्जत पोलीस स्टेशनसमोर निरीक्षक चंद्रशेखर यादव, गटविकास अधिकारी अमोल जाधव आदींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कर्जत तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मोतीराम शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश जेवरे, सचिव नीलेश दिवटे, खजिनदार मुन्ना पठाण, सल्लागार मच्छिंद्र अनारसे, ज्येष्ठ पत्रकार सुभाष माळवे, अफरोज पठाण, तालुका प्रेस क्लबचे सचिव भाऊसाहेब तोरडमल, थेरगावचे ग्रामसेवक शरद कवडे, पोलीस पाटील ईश्वर जोगदंड, सरपंच रवींद्र महारनवर, उपसरपंच रामा शिंदे, विठ्ठल ननवरे, बाळासाहेब महारनवर, मिनीनाथ शिंदे, तात्याभाऊ महारनवर उपस्थित होते.

--------

फोटो - २६कर्जत वृक्षारोपण

कर्जत पोलीस स्टेशनच्या आवारात वृक्षारोपण करताना पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व पत्रकार.

Web Title: Plantation at Karjat Police Station