शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डीत धावपट्टीवरून विमान घसरले, मोठी दुर्घटना टळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2018 22:54 IST

मुंबईहून आलेले विमान शिर्डी विमानतळावर उतरताना धावपट्टी सोडून बाहेर गेले़ सुदैवाने कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नसली, तरी मोठी दुर्घटना टळली आहे़ ही घटना सोमवारी सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास घडली.

 शिर्डी - मुंबईहून आलेले विमान शिर्डी विमानतळावर उतरताना धावपट्टी सोडून बाहेर गेले़ सुदैवाने कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नसली, तरी मोठी दुर्घटना टळली आहे़ ही घटना सोमवारी सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास घडली.सध्या शिर्डीहून मुंबई व हैद्राबाद विमानांची प्रत्येकी एक-एक फेरी होते़ सोमवारी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास मुंबईहून आलेले एअर अलाएन्सचे विमान धावपट्टी सोडून जवळपास शंभर फूट बाजूच्या रिकाम्या जागेत गेले़ वैमानिकाचे विमानाच्या गतीवरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येते़ मूळ धावपट्टीवर विमान लॅन्ड होण्याऐवजी रेखा एरियासाठी उभारलेल्या विस्तारीत धावपट्टीच्या पुढे शंभर फूट हे विमान गेले़ या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला़ ७२ आसनी असलेल्या या विमानातून ४२ प्रवासी प्रवास करीत होते़या घटनेनंतर मुंबईला जाणाऱ्या विमानाबरोबरच हैद्राबादला जाणाºया विमानाचे उड्डाणही रद्द करावे लागले. उशीर झाल्याने व शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा नसल्याने हैद्राबादचे विमान रद्द करण्यात आले़ यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली़ साईबाबांच्या आशीर्वादाने वाचलो, अशी प्रतिक्रिया विमानातील काही प्रवाशांनी दिली.....प्राथमिक माहितीनुसार या घटनेत वैमानिकाची चूक दिसते़ विमान योग्य जागेवर लॅन्ड न झाल्याने ही घटना घडली़ यात कोणतीही हानी झालेली नाही. सर्व प्रवासी सुखरूप आहेत़ या घटनेचा अहवाल मागितला आहे़ विमानतळ विकास कंपनीच्या वतीने या घटनेची चौकशी करण्याची मागणी करण्यात येणार आहे़-सुरेश काकाणी, व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी.------------जेथे रन-वे संपतो तेथून हे विमान १०० फूट पुढे गेले. परंतु वैमानिकाच्या प्रसंगावधनाने पुढील अनर्थ ेटळला.-विरेन भोसले, संचालक, शिर्डी विमानतळ....फोटो-डेस्क.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरairplaneविमान