केंद्रातील योजना बांधावर नेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:27 IST2021-07-07T04:27:17+5:302021-07-07T04:27:17+5:30

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेले विविध निर्णय त्यांच्या बांधापर्यंत पोचविण्याचे काम भाजपा किसान मोर्चा करणार आहे, ...

The plan at the center will lead to the dam | केंद्रातील योजना बांधावर नेणार

केंद्रातील योजना बांधावर नेणार

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेले विविध निर्णय त्यांच्या बांधापर्यंत पोचविण्याचे काम भाजपा किसान मोर्चा करणार आहे, अशी माहिती भाजपा किसन मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी दिली.

राज्यव्यापी शेतकरी संवाद अभियानाचा नगरमध्ये मंगळवारी प्रारंभ झाला. याबाबत गांधी मैदान येथील पक्ष कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी काळे म्हणाले, राज्य सरकारमुळे केंद्र सरकारच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यास उशीर होत आहे. अनेक शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या योजनांपासून वंचित राहावे लागते. यासाठी आता आम्ही शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन जनजागृती मोहीम राबविणार आहोत. योजनांचा लाभ शेतकऱ्यांना कसा घेता येईल, याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

यावेळी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, भानुदास बेरड, अभय आगरकर, वसंत लोढा, सुनील रामदासी, सचिन पारखी, नरेंद्र कुळकर्णी, अमित गटने, सुनील पंडित, महेंद्र गंधे, ऋषिकेश देशमुख, सूरज कुरलीये आदी उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब मुरकुटे यांची किसान मोर्चाच्या नगर जिल्हा व पुणे ग्रामीण जिल्हा किसन मोर्चाच्या प्रभारीपदी निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्षपदी सतीश कानवडे, संघटन सरचिटणीसपदी रोहिदास साबळे, उपाध्यक्षपदी नरेंद्र नवले, संदीप उगले, ज्ञानेश्वर पेचे, मदन चौधरी, अनिल फटागरे, विजय इनामके, भाऊसाहेब बोर्डे, सरचिटणीसपदी -योगिता होन, संजय बोठे, सुरेश गबाळे, अनिल थोरात, साहेबाना घुगे, सचिवपदी - अविनाश कराळे, कैलास दहातोंडे, मच्छींद्र जाधव, जनार्दन रोहम, उत्तम बडे, अमोल गोडसे, कोषाध्यक्षपदी- प्रशांत कोडीलकर, प्रसिद्धी प्रमुख पदी- कृष्णा वेताळ, नवनाथ वावरे आदीची निवड करण्यात आली.

-------

०६ बीजेप

अहमदनगरी येथील भाजपा कार्यालयात मंगळवारी झालेल्या बैठकीत बोलताना भाजपा किसन मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे. समवेत स्थानिक पदाधिकारी.

Web Title: The plan at the center will lead to the dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.