शहरातील खड्डे बुजविण्यास अखेर सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:27 IST2021-09-17T04:27:02+5:302021-09-17T04:27:02+5:30
अहमदनगर : पावसामुळे दुर्दैशा झालेल्या शहरातील रस्त्यांतील खड्डे बुजविण्याच्या कामाला अखेर गुरुवारी सुरुवात झाली आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाने खड्डे ...

शहरातील खड्डे बुजविण्यास अखेर सुरुवात
अहमदनगर : पावसामुळे दुर्दैशा झालेल्या शहरातील रस्त्यांतील खड्डे बुजविण्याच्या कामाला अखेर गुरुवारी सुरुवात झाली आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्यास सुरुवात केली असून, या कामाची आमदार संग्राम जगताप यांनी पाहणी केली.
पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. गेल्या महिनाभरापासून नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करीत आहेत. आमदार संग्राम जगताप यांनी याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन खड्डे बुजविण्याच्या सूचना केल्या होत्या. महापालिकेच्या बांधकाम विभागाने गुरुवारी खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. शहरातील रस्त्यांतील खड्डे खडी व डांबर टाकून बुजविण्यात येत आहेत. या कामाची आमदार जगताप यांनी पाहणी केली. ते म्हणाले, की शहरातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यास लवकरच मंजुरी मिळेल. त्यानुसार टप्प्याटप्प्याने रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शहर अभियंता सुरेश इथापे, वैभव वाघ, संतोष लांडे, आदी उपस्थित होते.
....
सूचना : फोटो १६ पॅचिंग नावाने आहे.