पिंपळगाव पिसा कोरोना प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:22 IST2021-04-08T04:22:02+5:302021-04-08T04:22:02+5:30

विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा कोरोना प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. तहसीलदार प्रदीप पवार यांनी याबाबतचा आदेश ...

Pimpalgaon Pisa Corona Prohibited Area Declared | पिंपळगाव पिसा कोरोना प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर

पिंपळगाव पिसा कोरोना प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर

विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा कोरोना प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. तहसीलदार प्रदीप पवार यांनी याबाबतचा आदेश दिला आहे.

पिंपळगाव पिसा येथे गेल्या दोन दिवसांत पंधरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने प्रशासनाने ६ ते १२ एप्रिल या कालावधीत आरोग्य सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. बेलवंडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार बजरंग गवळी, पोलीस पाटील सुनील शिवणकर यांनी सर्व व्यावसायिकांना दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना केल्या.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पिंपळगाव पिसा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. जयदेवी राजेकर यांनी नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी व आरोग्यविषयक काही अडचणी आल्यास संपर्क साधावा, असे आवाहन केले. आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू केले.

Web Title: Pimpalgaon Pisa Corona Prohibited Area Declared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.