पिंपळगाव माळवीत विजेचा खेळखंडोबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:26 IST2021-06-09T04:26:18+5:302021-06-09T04:26:18+5:30
पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी पंचक्रोशीत मागील काही दिवसांपासून लपंडाव सुरू आहे. महावितरणच्या या अनागोंदी कारभाराचा परिसरातील ...

पिंपळगाव माळवीत विजेचा खेळखंडोबा
पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी पंचक्रोशीत मागील काही दिवसांपासून लपंडाव सुरू आहे. महावितरणच्या या अनागोंदी कारभाराचा परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सतत वेगवेगळ्या कारणांनी विजेचा लपंडाव सुरू आहे. आठ हजार लोकसंख्या असलेल्या पिंपळगाव माळवी पंचक्रोशीमध्ये मागील आठवड्यापासून सतत वीजपुरवठा खंडित होत आहे. महावितरण काहीतरी थातुरमातुर कारण सांगून वेळ निभावून नेत आहे. मागील सलग तीन दिवसांपासून रात्रीच्या वेळी बारा ते १५ तास विद्युत पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असून गावचा पाणी पुरवठाही विस्कळीत होत आहे. महावितरणचे कर्मचारी याबाबत चौकशी केल्यास उडवाउडवीची उत्तरे देतात. थोड्या जरी पावसाला सुरुवात झाली की लगेच वीज गायब होणे हा प्रकार नित्याचाच झाला आहे.