पिंपळगाव माळवीत चित्रनगरी उभारणार

By Admin | Updated: March 27, 2017 16:19 IST2017-03-27T16:19:36+5:302017-03-27T16:19:36+5:30

नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी तलाव परिसरात चित्रपटनगरी उभारण्याची घोषणा आज (सोमवारी) झालेल्या महापालिकेच्या सभेत करण्यात आली़

Pimpalgaon Malave will be set up in Chitranagari | पिंपळगाव माळवीत चित्रनगरी उभारणार

पिंपळगाव माळवीत चित्रनगरी उभारणार

अहमदनगर : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी तलाव परिसरात चित्रपटनगरी उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून, त्याबाबतची घोषणा आज (सोमवारी) झालेल्या महापालिकेच्या सभेत करण्यात आली़ नगरमध्ये चित्रपटनगरी व्हावी, यासाठी ‘लोकमत’ने ‘वेध’ सदरातून भूमिका मांडली होती़ या भूमिकेचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले होते़
नगर जिल्ह्यात पारनेर, नगर, जामखेड, कर्जत, शिर्डी, अकोले तालुक्यात अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झालेले आहे़ नगरमधून अनेक दिग्दर्शक, निर्माते पुढे येत आहे़ नगरमधूनच दिग्दर्शन, निर्मिती आणि तांत्रिक बाबी पेलून पूर्णपणे नगरकरांची निर्मिती असलेले चित्रपट मागील दोन वर्षात तयार झाले़ या चित्रपटांनी चांगले नावही कमावले़ नगरमधून अनेक दिग्दज कलाकार, दिग्दर्शकही तयार झाले़ याबाबत ‘लोकमत’ने ‘वेध’ सदरात आढावा घेत नगरमध्ये चित्रपटनगरी उभारण्याची अपेक्षा व्यक्त केली होती़ त्यानंतर महापालिकेने सोमवारी झालेल्या सभेत चित्रपटनगरी उभारण्याचा निर्णय घेतला आहे़

Web Title: Pimpalgaon Malave will be set up in Chitranagari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.