ढाकणेंना साथ दिली असती तर चित्र वेगळे असते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:26 IST2021-06-09T04:26:19+5:302021-06-09T04:26:19+5:30
पाथर्डी : सामाजिक कार्यात प्रताप ढाकणे हे नेहमीच अग्रेसर असतात. माझ्या सामाजिक जीवनाला सुरुवात केली, तेव्हा प्रतापकाकांनीच मला संघर्ष ...

ढाकणेंना साथ दिली असती तर चित्र वेगळे असते
पाथर्डी : सामाजिक कार्यात प्रताप ढाकणे हे नेहमीच अग्रेसर असतात. माझ्या सामाजिक जीवनाला सुरुवात केली, तेव्हा प्रतापकाकांनीच मला संघर्ष करण्याची शिकवण दिली. इथल्या जनतेने विधानसभा निवडणुकीत त्यांना थोडी अजून साथ दिली असती, तर आज या भागाचे चित्र वेगळे असते, असे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी केले.
आमदार लंके यांनी सोमवारी दुपारी पाथर्डीतील सुमनताई ढाकणे कोविड सेंटरला भेट दिली. थेट कोरोनाग्रस्त रूग्णांजवळ जाऊन त्यांनी त्यांची विचारपूस केली.
लंके म्हणाले, ढाकणे कुटुंब अनेक वर्षांपासून समाजकार्यात आहे. पारनेरमध्ये मी सामाजिक जीवनाची सुरुवात केल्यावर वारंवार प्रताप ढाकणे यांचे मार्गदर्शन घेत गेलो. संघर्षांची शिकवण त्यांच्याकडूनच मिळाली. कायम लोकांच्या संपर्कात राहिल्याने समाजमन कळले. भाळवणीत कोरोना सेंटर सुरू केल्यानंतर ढाकणे यांनीच माझ्या कार्याला पाठिंबा दिला. प्रतापकाका दवाखान्यात असतानाही मला फोन करून विचारपूस करायचे, असे लंके यांनी सांगितले.
योगेश रासने यांनी कोविड सेंटरची माहिती दिली. यावेळी देवा पवार, शिवसेनेचे रफिक शेख, बाजार समितीचे संचालक बाळासाहेब घुले, अक्रम आतार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. एम.पी. आव्हाड व शिवाजी बडे यांनी लंके यांचे स्वागत केले.
---
०७पाथर्डी लंके
पाथर्डी येथील सुमनताई ढाकणे कोविड सेंटरमध्ये आमदार निलेश लंके यांनी कोरोनाबाधित रुग्णांची ऑक्सिजन पातळी तपासली.