पढेगावकरांना ज्योतिषाने घातला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 14:03 IST2018-01-29T14:00:07+5:302018-01-29T14:03:02+5:30

कुंडली काढुन देण्याच्या उद्देशाने कोपरगाव तालुक्यातील पढेगाव येथील नागरीकांना एका ज्योतिषाने मोबाईलसह हजारो रूपयांचा गंडा घातला आहे.

Phedgaonkar got astrology ceating | पढेगावकरांना ज्योतिषाने घातला गंडा

पढेगावकरांना ज्योतिषाने घातला गंडा

कोपरगाव : कुंडली काढुन देण्याच्या उद्देशाने तालुक्यातील पढेगाव येथील नागरीकांना एका ज्योतिषाने मोबाईलसह हजारो रूपयांचा गंडा घातला आहे.
औरंगाबादच्या या ज्योतिषाने गावातील काही लोकांना ३०० रूपयात कुंडली काढुन दिल्या. दुचाकी (क्रमांक एम.एच.२० ३११५) वरून गावात आलेल्या सदर ज्योतिषाने विश्वास संपादन करीत गावात दोन दिवस ठाण मांडले. निवृत्ती दाणे यांच्याकडून ३ हजार रूपये व १० हजाराचा मोबाईल घेऊन पोबारा केला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नागरीकांची चांगलीच तारांबळ उडाली. या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Web Title: Phedgaonkar got astrology ceating