फेसबुक, व्हॉटस्अॅपवर पीएफची माहिती
By Admin | Updated: June 5, 2014 00:06 IST2014-06-04T23:09:20+5:302014-06-05T00:06:51+5:30
अहमदनगर : विविध उद्योगातील कर्मचार्यांना फेसबुक आणि व्हॉटस्अॅपद्वारे भविष्यनिर्वाह निधीतील (पीएफ) नवीन बदलांबाबत माहिती देण्यात येणार आहे़
फेसबुक, व्हॉटस्अॅपवर पीएफची माहिती
अहमदनगर : विविध उद्योगातील कर्मचार्यांना फेसबुक आणि व्हॉटस्अॅपद्वारे भविष्यनिर्वाह निधीतील (पीएफ) नवीन बदलांबाबत माहिती देण्यात येणार आहे़ कर्मचार्यांच्या तक्रारीही व्हॉटस्अॅप व एसएमएसद्वारे स्वीकारण्यात येणार आहे़ त्यासाठी भविष्यनिर्वाह निधी नाशिक क्षेत्रीय कार्यालयाने ९४२३००८५९६ हा क्रमांक जाहीर केला आहे़ असा प्रयोग राबविणारे नाशिक हे राज्यातील पहिले क्षेत्रीय कार्यालय ठरले आहे़ भविष्यनिर्वाह निधीतील नवीन बदलाबाबत विविध उद्योगात काम करणार्या कर्मचार्यांना माहिती व्हावी, यासाठी नाशिक कार्यालयाने फेसबुकवर ‘ईपीएफओएसआरओनासिक’ या नावाने पेज तयार केले आहे़ या पेजला कर्मचार्यांनी लाईक केल्यास पीएफबाबत नवीन माहिती कर्मचार्यांना या पेजवरुन पुरविण्यात येणार आहे़ कर्मचार्यांना पीएफ संदर्भात काही तक्रारी असल्यास पूर्वी कार्यालयात जावून तक्रार अर्ज भरुन द्यावा लागत होता़ मात्र, आता कर्मचार्यांना तात्काळ तक्रार करता यावी, यासाठी व्हॉटसअॅप व एसएमएस सेवा नाशिक कार्यालयाने सुरु केली आहे़ कर्मचार्यांना व्हॉटसअॅप व एसएमएसद्वारे तक्रार नोंदविण्यासाठी ९४२३००८५९६ हा क्रमांक क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त जगदिश तांबे यांनी जाहीर केला आहे़ या क्रमांकावर कोणालाही दूरध्वनी करुन संपर्क करता येणार नाही़ मात्र, व्हॉटसअॅप किंवा एसएमएस केल्यास तक्रारदारांना काही वेळातच तक्रारीबाबत प्रतिसाद मिळेल, असे या कार्यालयाकडून सांगण्यात आले़ या सेवेचा शुभारंभ प्रवरानगर (ता़राहाता,जि़अहमदनगर) येथील डॉ़ धनंजयराव गाडगीळ सभागृहात आयोजित कार्यशाळेत तांबे यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला़ यावेळी सहाय्यक भविष्य निधी आयुक्त सुबोध सुलाखे, प्रवर्तन अधिकारी सुरेंद्र कुलकर्णी, ए़ ए़ शेख, विखे सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब निबे, डी़ यु़ खर्डे आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)नाशिक कार्यालयाने फेसबुकवर ‘ईपीएफओएसआरओनासिक’ या नावाने पेज तयार केले आहे़ पेजला कर्मचार्यांनी लाईक केल्यास पीएफबाबत नवीन माहिती कर्मचार्यांना या पेजवरुन पुरविण्यात येणार आहे़